ETV Bharat / business

गॅस सिलिंडरच्या दरात 16.5 रुपयांची वाढ, व्यावसायिकांना बसणार फटका - GAS CYLINDER RATE

दोन महिन्यात सरकारी तेल कंपन्यांनी सुमारे 78 रुपयांनी व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढविले आहेत. त्यामुळे व्यावसायिक आस्थापनांच्या खर्चात आणखी भर पडणार आहे.

Gas cylinder rate
गॅस सिलिंडर दर (Source- IANS)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2024, 9:52 AM IST

Updated : Dec 1, 2024, 10:11 AM IST

नवी दिल्ली- सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी पुन्हा एकदा व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढविले आहेत. नव्या दरानुसार व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 16.5 रुपयांनी वाढले आहेत. हे नवे दर तत्काळ लागू झाले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळालेला आहे.

19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर आजपासून 16.5 रुपयांनी वाढले आहेत. नव्या दरानुसार दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर आजपासून 1,818.50 रुपये असणार आहे. तर 5 किलो गॅस सिलिंडरचे दर 4 रुपयांनी वाढणार आहेत. दुसरीकडं 14.2 किलो घरगुती गॅस सिलिंडरचे दर 'जैसे थे' राहणार आहेत.

  • कोणत्या कारणांनी गॅस सिलिंडरचे वाढतात दर- जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे वाढलेले दर, बाजारपेठेतील वाढती मागणी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरलेले मूल्य आणि जागतिक बाजारपेठेतील बदलती स्थितीनुसार गॅस सिलिंडरचे दर बदलतात.
  • दरवाढीचा कुणाला बसणार फटका- गेल्या महिन्यात 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 62 रुपयांनी वाढले. व्यासायिक सिलिंडरचा वापर हॉटेल, रेस्टॉरंटसह व्यावसायिक आस्थापना आणि लहान व्यवसायांमध्ये केला जातो. त्यामुळे व्यावसायिकांना या दरवाढीचा फटका बसणार आहे.

गॅस सिलिंडरची कशी करावी बचत-

एलपीजी गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी स्वयंपाकाच्या गॅसची बचत करावी लागते. काही टिप्स वापरून तुम्ही गॅसची बत करू शकता.

  • भांडी स्वच्छ पुसून घ्या-स्वयंपाकाच्या भांड्यात पाणी तसेच असेल तर गॅसचा जास्त वापर करावा लागतो. त्यामुळे भांडी स्वच्छ पुसून आणि कोरडी करून वापरा.
  • भांडे झाकून ठेवा-बरेच लोक स्वयंपाक करताना पातेल्यावर झाकण ठेवत नाहीत. त्यामुळे अन्नपदार्थ शिजण्यासाठी वेळ लागतो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही प्रेशर कुकर देखील वापरू शकता. अशा प्रकारे तुम्ही काही गॅस वाचवू शकता.
  • तांदूळ आणि डाळ शिजविण्यापूर्वी भिजवावी-तांदूळ आणि डाळी शिजवण्यापूर्वी पाण्यात काही वेळ भिजू घालावीत. कारण, असे तांदूळ आणि डाळ भिजवून शिजवले तर शिजविण्याकरिता कमी वेळ लागतो.

हेही वाचा-

  1. दिवाळीत फुटला महागाईचा बॉम्ब, एलपीजी सिलिंडरचे वाढले दर
  2. सरकार गॅसवर? 'मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने'त सावळा गोंधळ, लाभार्थ्यांना लाभ घेताना नाकेनऊ

Last Updated : Dec 1, 2024, 10:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.