मुंबई -दिवाळीनिमित्त भारतीय शेअर बाजारात मुहूर्त पाहून खरेदी करण्याची परंपरा कायम आहे. या दिवशी स्टॉक एक्सचेंजमध्ये सुट्टी असली तरी संध्याकाळी मुहूर्त ट्रेडिंगसाठी ते फक्त एका तासासाठी उघडले जाते. यानिमित्ताने आज शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024 रोजी BSE आणि NSE एक्सचेंजमध्ये सायंकाळी एक तासासाठी विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्राच आयोजन केलं जातं. मुहूर्त ट्रेडिंग प्री ओपनिंगची वेळ ही संध्याकाळी 5:45 ते 6 वाजेपर्यंत असणार आहे.
68 वर्षांची जुनी परंपरा :शेअर बाजारामध्ये दिवाळीला मुहूर्त खरेदी करण्याची परंपरा ही जवळपास 68 वर्षे जुनी आहे. हिंदू कॅलेंडर वर्षानुसार पाहिले तर हिंदू विक्रम संवत वर्ष 2081 हे एप्रिल महिन्यात सुरू होते, परंतु मराठी कॅलेंडरनुसार हे वर्ष दिवाळीच्या दिवसापासून सुरू झाल्याचं मानलं जातंय. संपूर्ण भारत देशात हा सण संपत्ती समृद्धी आणि सौभाग्य यांचे स्वागत करण्यासाठी सर्वात शुभ काळ मानला जातो. या कारणाने या मुहूर्ताच्या व्यवहाराशीसुद्धा शेअर बाजाराची एक संकल्पना जोडली गेलीय. शेअर बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार गुंतवणूक सुरू करण्यासाठी या दिवसाला विशेष महत्त्व देतात.
अनेक विभागांमध्ये गुंतवणूक : संध्याकाळी होणाऱ्या मुहूर्त ट्रेडिंग स्लॉटमध्ये इक्विडिटी, कमोडिटी डेरिव्हेटिज, इक्विडिटी फ्युचर्स आणि ऑप्शन्स अँड सिक्युरिटीज लँडिंग अँड बोरॉइंग यांसारख्या अनेक विभागांमध्येसुद्धा ट्रेडिंग केलं जाईल. BSE आणि NSE ने 20 ऑक्टोबरला परिपत्रक काढून याची स्वतंत्र घोषणा केली होती. एरव्ही सामान्य दिवशी बाजार सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत उघडतो. तसंच बाजारपूर्व सत्र हे सकाळी 9:00 ते 9:15 पर्यंत असतं.
शुभ मुहूर्तावर गुंतवणूक लाभदायक?:हिंदू परंपरेनुसार मुहूर्त हा एक शुभकाळ असतो. त्या काळात ग्रहांची हालचाल ही अनुकूल मानली जाते. त्याचप्रमाणे शुभमुहूर्तावर कुठलेही काम केले तर त्याचे सकारात्मक परिणाम होतात, अशीही धारणा आहे. याच कारणाने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर लक्ष्मीपूजनावेळी शेअर बाजार तासभर उघडला तर हिंदू धर्मीय लोक त्यांची गुंतवणूक सुरू करतात. मागच्या वर्षी 8 कोटी लोकांनी शुभ मुहूर्तावर गुंतवणूक केली होती.
हेही वाचाः