मुंबई - शेअर बाजारातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येतेय. उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवर या कंपनीवर सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(SECI) ने मोठी कारवाई केलीय. याचा परिणाम म्हणजे शुक्रवारी बाजार उघडताच रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. रिलायन्स पॉवरचे जे शेअर्स 54 रुपये गेले होते, तेच कंपनीवरील कारवाईनंतर घसरलेत. शुक्रवारी रिलायन्स पॉवर या कंपनीचा शेअर्स 41 रुपयांच्या पातळीपर्यंत खाली आलाय. त्यामुळं अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवर कंपनीला मोठा धक्का बसला असून, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवर कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी घातलीय.
बंदीचे कारण काय? : शुक्रवारी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर गडगडल्यामुळं ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती किंवा कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते. ते अडचणीत सापडले असून, त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स एनयू बीईएसएस लिमिटेड या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी घालण्यात आलीय. निविदेत सहभागी होण्यासाठी अनिल अंबानींच्या कंपनीने बोगस कागदपत्रं सादर केली होती. गैर मार्गाने कागदपत्रं बनवून ती सादर केल्यामुळेच रिलायन्स पॉवर कंपनीवर कारवाई करण्यात आल्याचं सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं म्हटलंय. या कारवाईमुळं अनिल अंबानींना मोठा धक्का बसला असून, नुकतेच अनिल अंबानी यांनी सिंगापूरच्या कंपनीचे 485 कोटी रुपयांचे कर्ज फेडले होते. या कर्जातून मुक्त झाल्यानंतर कुठे अनिल अंबानी सावरत असताना आता त्यांच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी घातल्यामुळं त्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झालीय.
...म्हणून शेअर्स गडगडले: महत्त्वाचे रिलायन्सवर पॉवर कंपनीवर करण्यात आलेल्या कारवाईवर रिलायन्स पॉवर कंपनीकडून आक्षेप घेण्यात आलाय. ही अनावश्यक कारवाई असून आणि चुकीची आहे. आम्ही त्याच्या विरोधात लढाई देऊ, आर्थिक गुन्हे शाखेकडे फौजदारी तक्रार दाखल केलीय, आम्ही कायद्याच्या प्रक्रियेचे पालन करू", अशी माहितीही रिलायन्स पॉवर कंपनीनं दिलीय. दुसरीकडे कंपनीच्या या कारवाईनंतर रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात गडगडलेत. "कारण रिलायन्स पॉवर कंपनीवर सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कारवाई केल्यामुळं ज्या गुंतवणूकदारांनी रिलायन्स पॉवरचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कंपनीची विश्वासार्हता कमी झालीय. याचा स्वाभाविक थेट परिणाम रिलायन्सच्या शेअर्सवर झाल्यामुळं त्याच्या शेअरच्या किमती गडगडल्या आहेत", असं शेअर बाजार तज्ज्ञ सिद्धार्थ कुवावाला यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितले आहे.
हेही वाचाः
लक्ष्मीपूजन मुहूर्तावर शेअर बाजार एक तासासाठी खुला, गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद
Dhantrayodashi 2024 : स्वस्त सोनं कुठं मिळतं? इथं करा फक्त 1001 रुपयांमध्ये शुद्ध सोनं खरेदी