नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (EPFO)च्या खातेदार अन् कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारने दिवाळीपूर्वी ईपीएफओच्या 6 कोटी सदस्यांना मोठं गिफ्ट दिलंय. केंद्र सरकारने एम्प्लॉयी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स म्हणजेच EDLI योजनेची शेवटची तारीख 28 एप्रिल 2024 नंतरही वाढवण्याचा निर्णय घेतलाय. खरं तर केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी कर्मचारी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) योजनेअंतर्गत सेवानिवृत्ती निधी संस्था EPFO च्या सर्व सदस्यांना वाढीव विम्याचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय. EPFO च्या सर्व सदस्यांना एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स योजनेअंतर्गत सेवानिवृत्ती निधीचा लाभ दिला मिळणार आहे. यामुळे 6 कोटींहून अधिक EPFO सदस्यांना 7 लाख रुपयांपर्यंतचे जीवन विमा संरक्षण कवच मिळणार आहे.
EDLI योजना काय आहे?: EDLI योजना 1976 मध्ये सुरू झालीय. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना विम्याचे फायदे देणे हा त्याचा उद्देश आहे. खरं तर EPFO सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये. प्रत्येक सदस्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, अशी त्यांची भावना आहे.
योजनेचा लाभ तुम्हाला कसा मिळणार?: EDLI योजनेच्या नियमांनुसार, एप्रिल 2021 पर्यंत कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारसांना जास्तीत जास्त 6 लाख रुपयांचा लाभ दिला जातो, त्यानंतर अधिसूचना जारी करून कायदेशीर वारसांना कमीत कमी आणि कमाल लाभ देण्यात आला होता. 3 वर्षांच्या आत EDLI योजना 27 एप्रिल 2024 पर्यंत वाढवण्यात आलीय, ज्यामध्ये किमान लाभ 2.5 लाख आणि कमाल लाभ 7 लाख रुपये होता. कोणत्याही संस्थेत 12 महिने सतत सेवेची अटही शिथिल करण्यात आली होती, जेणेकरून त्या कालावधीत नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही संरक्षण मिळू शकेल. आता नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार कर्मचाऱ्यांना 7 लाख रुपयांच्या जीवन विम्याचा लाभ दिला जाणार आहे. हा नियम 28 एप्रिल 2024 पासून लागू झालाय.
EPFO मधून पैसे काढण्याचे नवे नियम काय?
- EPF मधून आंशिक पैसे काढण्यासाठी EPF सदस्याला ऑनलाइन अर्ज करावा लागतो. केवळ शिक्षण, घर खरेदी किंवा बांधकाम, लग्न आणि उपचार यासाठी पैसे काढता येतात.
- EPFO च्या पैसे काढण्याच्या नियमांनुसार, EPF धारक निवृत्तीच्या एक वर्ष आधी 90 टक्के रक्कम काढू शकतो. 90 टक्के काढण्यासाठी सदस्याचे वय 54 वर्षांपेक्षा जास्त असावे.
- आजच्या काळात अनेक कंपन्यांमध्ये टाळेबंदी होत आहे. अशा परिस्थितीत ईपीएफओच्या नियमांनुसार, जर कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आणि कर्मचारी निवृत्तीपूर्वी बेरोजगार झाला तर तो ईपीएफ फंडातून पैसे काढू शकतो.
- कर्मचारी एका महिन्याच्या बेरोजगारीनंतर 75 टक्के पैसे काढू शकतो आणि जर तो सलग 2 महिने बेरोजगार राहिला तर पूर्ण पैसे काढू शकतो. नवीन नोकरी मिळाल्यानंतर कर्मचारी उर्वरित 25 टक्के निधी नवीन EPF खात्यात हस्तांतरित करू शकतो.
- जर एखाद्या कर्मचाऱ्याने EPF मध्ये सलग 5 वर्षे योगदान दिले तर त्याला पैसे काढण्याच्या वेळीदेखील कर लाभ मिळतो. मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढल्यास टीडीएस कापला जातो. 50 हजार रुपयांपेक्षा कमी पैसे काढल्यास टीडीएस कापला जात नाही.
- जर सदस्याने पैसे काढण्यासाठी पॅन कार्ड सादर केले असेल तर 10 टक्के टीडीएस कापला जातो. पॅन कार्ड सादर न केल्यास 30 टक्के कपात केली जाते.
हे वाचलंत का :
EPFO ने खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलले, नवा नियम जाणून घ्या अन्यथा...