ETV Bharat / politics

पुणे शहरात महायुती वरचढ; ग्रामीण भागात 'काटे की टक्कर', तर बारामती दादांचीच?

विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक प्रक्रिया पार पडली असून, आता सर्वांना निकालाचे वेध लागले आहे. येत्या 23 तारखेला विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे.

Maharashtra Assembly Election 2024
महायुती आणि महाविकास आघाडी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

पुणे : राज्यभरात बुधवारी मतदान पार पडलं. राज्यात जवळपास 65 टक्के मतदान झालं असून, पुणे जिल्ह्यात एकूण ६१.०५ टक्के मतदान झालं. पुणे शहर तसंच जिल्ह्यात अनेक मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला असून, हा वाढलेला टक्का कोणाचा? तसेच याचा नेमका फायदा कोणत्या पक्षाला होणार? पुणे शहर आणि जिल्ह्यात कोणत्या पक्षाची काय परिस्थिती असणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघात काय परिस्थिती असणार? याबाबत पुणे शहरातील विविध वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांशी बातचीत केली आहे 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी...

बारामती दादांची? : "बारामतीत 2019 मध्ये अजित पवार हे खूप जास्त मतांनी निवडून आले होते. यावेळेसचं चित्र थोडं वेगळं असून, अजित पवारांचं मताधिक्य कमी होईल, पण ते निवडून येण्याची शक्यता जास्त आहे," असं मत एका ज्येष्ठ पत्रकारानं 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना मांडलं. "बारामतीत शरद पवार यांना असलेली सहानुभूती व अजित पवार यांनी केलेला विकास आणि जोडलेली नवीन पिढी यामुळं येथे काय निकाल येणार हे आता सांगणं कठीण आहे. बोलताना मतदार हे अजित पवार यांचं नाव घेत असले तरी शरद पवार यांच्याबाबतची भावनिक साद येथे पाहायला मिळण्याची शक्यता आहे," असंही मत काही पत्रकारांनी मांडलं. बारामतीत अजित पवार हे निवडून येण्याची शक्यता जास्त असल्याचा सूर सर्वच पत्रकारांचा पाहायला मिळाला.

प्रतिक्रिया देताना शहरातील ज्येष्ठ पत्रकार (Pune News)

पुणे शहरात महायुती वरचढ? : "पुणे शहरातील आठ मतदारसंघात जास्त मतदान झालं. यात महिलांचाही मोठा वाटा होता. आठ पैकी महायुतीला चार ते पाच जागा, तर महाविकास आघाडीला तीन ते चार जागा मिळू शकतील, असा अंदाज आहे. जिल्ह्यातही महायुतीचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात अजित पवारांचे जास्त विद्यमान आमदार असून, याचा फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातही महायुतीला जास्त जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे. तसंच महाविकास आघाडीही जिल्ह्यात चांगली टक्कर देण्याची शक्यता आहे, " असं मत पुण्यातील काही ज्येष्ठ पत्रकारांनी व्यक्त केलं.

महाविकास आघाडी देणार टक्कर? : "पुणे शहरात काँग्रेसमधील काही नेत्यांनी बंडखोरी केली होती. याचा फटका हा महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं शहरात महायुतीसाठी चांगलं वातावरण असल्याचं दिसून येत आहे. जिल्ह्यात मात्र महायुती आणि महाविकास आघाडीत टक्कर पाहायला मिळणार आहे. तसंच शहरात 'नोटा'ला देखील जास्त पसंती असण्याची शक्यता आहे," असं मत ज्येष्ठ पत्रकारांनी व्यक्त केलं.

नोट : पुण्यातील ज्येष्ठ पत्रकारांनी त्यांच्या अभ्यासातून केलेलं विश्लेषण आहे. मांडलेले सर्व अंदाज आणि शक्यता आहेत. याबाबत 'ईटीव्ही भारत' कोणताही दावा करत नाही. अधिकृत निकाल निवडणूक आयोग हा येत्या 23 नोव्हेंबरला जाहीर करणार आहे.

हेही वाचा -

  1. "मोदींच्या मदतीने देशाला लुटणाऱ्या अदानींच्या अटकेची राहुल गांधींची मागणी योग्यच", नाना पटोले कडाडले
  2. महाराष्ट्रात यंदा 30 वर्षांतील सर्वाधिक मतदान; वाढलेल्या टक्केवारीचा नेमका फायदा कोणाला?
  3. "मतदान टक्केवारी वाढीचा फायदा भाजपाला, सत्तेत आम्हीच येणार"; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.