हैदराबाद World Blood Donor Day: रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. कारण यामुळे तुम्ही एखाद्याला जीवनदान देवू शकता. तज्ज्ञांच्या मते रक्तदान केल्यानं आरोग्य विषयक अनेक फायदे होतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य आणि मानसिक आरोग्य सुधारते. वजन नियंत्रणात राहते. असं असून सुद्धा अनेक जण भीत पोटी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत नाही. यालाच आळा घालण्यासाठी आणि रक्तदानाबाबत जागृकता निर्माण व्हावी याकरिता दरवर्षी १४ जून हा दिवस 'जागतिक रक्तदाता दिवस' म्हणून साजरा केला जातो
रक्तदाता दिवसाचा इतिहास: १४ जून १८६८ रोजी जन्मलेल्या कार्ल लॅंडस्टेनरच्या जयंतीनिमित्त जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. त्यांना आधुनिक रक्त संक्रमण प्रक्रियेचं जनक म्हटलं जातं. त्यांना १९३० मध्ये रक्तगटांच्या शोधासाठी नोबल पारितोषिक मिळालं आहे. रक्ताचं ए,बी, एबी, आणि ओ गटांमध्ये वर्गीकरण करणारे लॅंडस्टेनर पहिले शास्त्रज्ञ आहेत. जागतिक आरोग्य संघटना, इंटरनॅशलन फेडरेशन ऑफ रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट सोसायटीज यांच्या संयुक्त विद्यमानं २००५ पासून जागतिक रक्तदाता दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली.
भारताची स्थिती:भारतामध्ये दर दोन सेंकदाला रक्ताची आवश्यकता भासते. देशात सरासरी १४.०६ दशलक्ष रक्त युनिटची आवश्यकता आहे. परंतु भारताला सातत्यानं १ दशलक्ष युनिट्सच्या तुटवड्याचा सामना करावा लागतो. याचं निराकरण करण्यासाठी मंत्रालयानं रक्तदान 'अमृत महोत्सव मोहीम' सुरू केली आहे.
यावर्षीची थीम:दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन वेगवेगळ्या थीमनुसार साजरा केला जातो. या वर्षाची थीम 'दान साजरी करण्याची 20 वर्षे: रक्तदात्यांचे आभार'! ही आहे.
- रक्तदान करण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या
- पुरेशा प्रमाणात पाणी प्या.
- रक्तदान करण्यापूर्वी रात्री पुरेशी झोप घ्या.
- रक्तदान केल्यानंतर शारीरिक हालचाली आणि वजन उचलणं टाळा.
- लोहयुक्त पदार्थ खा (उदा. सुकामेवा, अंडी, सॅल्मन आणि संपूर्ण धान्य).
- रक्तदान केल्यानंतर 10-15 मिनिटे विश्रांती घ्या. गाणी ऐका, पुस्तक वाचा किंवा प्रतीक्षालयात इतरांशी बोला.
- नियमितपणे घेत असलेल्या प्रिस्क्रिप्शन आणि ओव्हर-द-काउंटर (OTC) औषधांची यादी सोबत ठेवा.
- साधारणत: १८ ते ६५ वयअसलेली व्यक्ती रक्तदान करू शकते.
- काही देशांमध्ये, राष्ट्रीय कायदा 16-17 वर्षे वयोगटातील मुलांना रक्तदान करण्याची परवानगी आहे. परंतु यात काही नियमांचं पाल करणं आवश्यक आहे.
- रक्तदात्याचं वजन किमान 45-50 किलो असावं.
- सर्दी, फ्लू, घसा खवखवणे, पोटातील जंत किंवा इतर कोणत्याही आजारानं ग्रस्त असलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
- जर एखाद्या व्यक्तीनं टॅटू काढलं असेल तर त्या तारखेपासून 6 महिन्यांपर्यंत रक्तदान करू शकत नाही.
- जर तुम्ही एखाद्या किरकोळ प्रक्रियेसाठी दंतवैद्याकडे गेला असाल, तर रक्तदान करण्यासाठी तुम्हाला २४ तास थांबावं लागतं.
- हिमोग्लोबिनची पातळी कमी असेल तर तुम्ही रक्तदान करू शकत नाही.
- रक्तदान करताना हिमोग्लोबिन चाचणी केली जाते. बऱ्याच देशांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी महिलांसाठी 12.0 g/dL आणि पुरुषांसाठी 13.0 g/dL पेक्षा कमी नसावी.
- मलेरीयावर उपचार केलेली व्यक्ती तीन महिने रक्तदान करू शकत नाहीत.
- एचआयव्ही चाचणी पॉझिटिव्ह आली असेल तर अशा व्यक्तीला रक्तदान करता येत नाही.
- इंजेक्शन मार्फत ड्रग्ज घेणाऱ्यांनी रक्तदान करू नये.
- स्तनदा मातांनी रक्तदान करू नये.
- वर्षभरात असुरक्षित शरीरसंबंध ठेवणाऱ्या व्यक्तीनं रक्तदान करू शकत नाही.
रक्तदान केल्याची फायदे
- हृदयविकाराचा धोका कमी होतो.
- स्ट्रेस कमी होता
- भावनिक आरोग्य सुधारतं
- नकारात्मक भावना दूर होतात.
- शरीरातील लोहाचं प्रमाण संतुलित राहतं
- रक्तदाब नियंत्रणात राहतो.
हेही वाचा
- वजन कमी करायचय; एक किलो वजन कमी करण्यासाठी तुम्हाला इतकं चालावं लागेल... - Health Tips
- दूषित अन्न खाल्ल्यानं दरवर्षी होतो 4 लाख लोकांचा मृत्यू, जगभरात आज साजरा होतोय 'जागतिक अन्न सुरक्षा दिन' - World Food Safety Day 2024