Union Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सलग आठवा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये त्यांनी बिहार राज्यासाठी विविध योजना जाहीर केल्या. त्यातच बिहार राज्यासाठी मखाना बोर्ड आणि अन्न प्रक्रिया संस्था स्थापन करण्यात येणार असल्याच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. मखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमळाच्या बिया अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यातील प्रोटीन, फायबर, अँटीऑक्सिडंट्स, कार्बोहायड्रेट्स आणि मिनरल्स शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. 2017 मध्ये जर्नल ऑफ फूड सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या " मखानाचे पौष्टिक आणि फायटोकेमिकल विश्लेषण" अभ्यासात मखाना आरोग्याासाठी कशाप्रकारे फायदेशीर आहे हे दर्शवले आहे.
- कशापासून तयार होतो मखाना
मखाना हे युरियाल फॉक्सचे बियाणे आहे. भारत आणि चीनमध्ये वाढणारी ही एक जलचर वनस्पती आहे. त्यांना फॉक्स नट्स आणि लोटस सीड्स म्हणतात. या बिया काढल्या जातात आणि वाळवल्या जातात. त्यानंतर मखाना तयार होतो. मखाना पौष्टिक नाश्तापैकी एक आहे. बिहारमधील मधुबनी, सुपौल, समस्तीपूर, सीतामढी आणि दरभंगा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मखान्याचं उत्पादन घेतलं जातं.
- 100 किलो मकानामध्ये पोषण घटक
- कॅलरीज - 347
- प्रथिने - 9.7 किलो
- कर्बोदके - 76.9 किलो
- फायबर - 14.5 ग्रॅम
- चरबी - 0.1 किलो
- कॅल्शियम - 60 मिग्रॅ
- लोह सामग्री - 1.4 मिग्रॅ
- मॅग्नेशियम - 67 मिग्रॅ
- पोटॅशियम - 500 मिग्रॅ
- फॉस्फरस - 200 मिग्रॅ
- मखाना खाण्याचे फायदे
- मखाना बियांमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त आहे. हे खाल्ल्यास जास्त वेळ पोट भरलं राहते. वजन कमी करणाऱ्यांनी त्यांच्या डाएटमध्ये मखाना ठेवावा कारणं मखाना वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
- मखाना हे एक उत्कृष्ट वनस्पती-आधारित प्रथिने असल्याने, ते स्नायूंच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते आणि एकूण ताकद वाढवण्यास मदत करते.
- मखानामध्ये समृद्ध असलेले फायबर आतड्यांसंबंधी आरोग्य आणि आतड्यांसंबंधी हालचाल सुधारते आणि अपचन आणि बद्धकोष्ठता सबंधित समस्या दूर करते.
- तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांनी आठवड्यातून एकदा मखाना घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते असं म्हटलं जाते.
- मखानामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते आणि पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळेच आहारात यांचा समावेश करून रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
- मखाना केवळ आरोग्यच सुधारत नाही तर त्वचेचे सौंदर्य देखील सुधारते. याचे नियमित सेवन केल्यास चेहऱ्यावरील मुरुम आणि सुरकुत्या यापासून त्वचेचे संरक्षण होऊ शकते, असं तज्ञांचे म्हणणं आहे.
संदर्भ
https://www.agricosemagazine.com/_files/ugd/93e822_f8b4d2a2859945c696d9dd27d2a1e0b8.pdf?index=true