मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तब्बल आठव्यांदा शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी विविध क्षेत्रांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा, महिला आदींसाठी काहीतरी देणारा अर्थसंकल्प असल्याचं बोललं जात आहे. परंतु, या अर्थसंकल्पातून सामान्य लोंकांना काय मिळालं? यावर तज्ञांनी काय म्हटलं वाचा सविस्तर...
सामान्यांना दिलासा : "हा अर्थसंकल्प म्हणजे सर्व क्षेत्रातील सर्व लोकांसाठी काहीतरी देणारा असा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सामान्य लोकांना दिलासा मिळाला. समाजातील गोरगरीब तसेच शेवटच्या घटकापर्यंत विचार करून हा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. विशेष म्हणजे, शेतकरी, नोकरदार, महिला, विद्यार्थी या सर्वांचा विचार करून अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळं आगामी काळात सर्व घटकांना या अर्थसंकल्पाचा फायदा होईल," अशी प्रतिक्रिया 'आयएमसी'च्या डेप्युटी डायरेक्टर शितल कारलो यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधताना दिली.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलेल्या महत्त्वाच्या घोषणा :
- केंद्र सरकारनं इलेक्ट्रिक वाहन उद्योगांना चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार लिथियम बॅटरीत लागाणारी कोबाल्ट पावडर स्वस्त करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन उद्योगांमधील लिथियमच्या उत्पादन खर्चात कपात होणार आहे. त्याचाच परिणाम म्हणून इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होण्याची शक्यता आहे. एकंदरीत इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे.
- टीव्हीचे देशांतर्गत पार्ट्स स्वस्त होणार आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी विदेशातून भारतात येणाऱ्या फ्लॅट पॅनेलवरील कर १० टक्क्यांवरून २० टक्के लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे देशात टीव्हीचे सुट्टे पार्ट्स स्वस्त होणार आहेत.
- भारतात तयार केलेली कपडे स्वस्त होणार आहेत. कापड उद्योगाला चालना देण्याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे.
- देशांतर्गत मोबाईल फोनचे उत्पादन वाढविण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्या धोरणाला अनुसरून मोबाईल फोनदेखील स्वस्त होणार आहे.
- 82 वस्तुंवरील सेस हटविण्यात आला आहे.
- ३६ जीवनावश्यक औषधांना सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
- कर्करोगाची आयात होणारी औषधे महाग असतात. अशा काही औषधांवरील सीमाशुल्क रद्द करण्यात येणार आहे.
- देशात वैद्यकीय क्षेत्राला चालना मिळण्याकरिता मेडिकल उपकरणे स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा :