नवी दिल्ली WhatsApp News: व्हॉट्सअॅपने आज सुरक्षित संवादाचे महत्त्व लक्षात घेत 'गोपनीयता मोहीम' लाँच (National Security Campaign) केली आहे. घरापासून दूर राहणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी ही मोहीम लाँच करण्यात आलीय. ही मोहीम महाराष्ट्रात आणि इतर सात राज्यांमध्ये ओओएच, प्रिंट, डिजिटल आणि सिनेमाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत, व्हॉट्सअॅप घरापासून दूर राहणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या प्रियजनांसोबत खासगी संवाद करताना सुरक्षितता निर्माण करते. यामधून वर्षानुवर्षे भर घालण्यात आलेल्या गोपनीयता आणि सुरक्षितता वैशिष्ट्यांच्या बिल्ट-इन स्तरांच्या माध्यमातून युजर-प्रायव्हसीप्रती व्हॉट्सअॅपची कटिबद्धता दिसून येते.
प्रायव्हसीप्रती व्हॉट्सअॅपची कटिबद्धता :जी व्यक्ति त्यांच्या मित्र, कुटुंबापासून दूर राहते आणि व्हॉट्सअॅपव्दारे त्यांच्याशी खाजगी संवाद साधते. अशा लोकांची सुरक्षितता आणि गोपनियता लक्षात घेऊन व्हॉट्सअॅपने ही मोहिम लाँच केलीय. यामधून वर्षानुवर्षे सुरु असलेल्या गोपनीयता आणि सुरक्षितता फीचरच्या बिल्ट-इन स्तरांच्या माध्यमातून युजरच्या प्रायव्हसीप्रती व्हॉट्सअॅपची कटिबद्धता दिसून येते. या मोहिमेंतर्गत एक जाहीरात देखील सुरु करण्यात आलीय. बीबीडीओ इंडियाची संकल्पना आणि प्रख्यात भारतीय चित्रपट दिग्दर्शक शिमित आमिन यांचे दिग्दर्शन असलेली ही जाहिरात आहे.
काय आहे जाहिरात :दिग्दर्शक शिमित आमिन यांचे दिग्दर्शन असलेली जाहिरात तरूण माणसाच्या प्रवासाला सादर करते, जो व्यावसायिक शेफ बनण्याचं स्वप्न साकारण्यासाठी नवीन शहरामध्ये जातो. नवीन संस्कृतीशी जुळून घेणाच्या, नवीन भाषा शिकण्याच्या आणि नवीन कामकाज शिकण्याचा हृदयस्पर्शी आणि आव्हानात्मक क्षणांना सादर करते. जाहिरातीमध्ये पाहायला मिळते की, व्हॉट्सअॅप त्याला सर्वात असुरक्षित क्षणांमध्ये देखील प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास कायम राखण्यास सुरक्षितता देते. तुम्ही जाहिरातीचा संपूर्ण व्हिडिओ येथे पाहू शकता: https://youtu.be/GNxr-veAgGI?si=YNQfa4Lu1n4mIKqT
कॉल्स, मॅसेज सुरक्षित ठेवण्यासाठी मदत: एण्ड-टू-एण्ड एन्क्रिप्शन व्हॉट्सअॅपवर कॉल्स व मेसेजेस् सुरक्षित ठेवण्यासह ही जाहिरात युजर्सना ब्लॉक अँड रिपोर्ट, टू-स्टेप व्हेरिफिकेशन आणि मेटा व्हेरिफाईड यासारख्या गोपनीयता फीचरची माहिती देते. हे फीचर संवादांची सुरक्षितता अधिक मजबूत करण्यास मदत करतात. एण्ड-टू-एण्ड एन्क्रिप्शन व्हॉट्सअॅपवर कॉल्स व मॅसेज सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करते. व्यवसाय प्रोफाइलवरील सत्यापित बॅज ग्राहकांना व्हॉट्सअॅपवर विश्वसनीय व्यवसाय ओळखण्यास मदत करतो, तसेच तो योग्य व्यवसायासोबत चॅटिंग करत असल्याची खात्री देतो.
गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह सुरक्षितता व संरक्षणाचा स्तर वाढवला आहे. जेथे ही वैशिष्ट्ये वापरकर्त्यांना गोपनीयपणे व्हॉट्सअॅपवर संवाद साधण्यास, तसेच त्यांनी निवडलेल्या व्यवसायांसोबत चर्चा करण्यास सक्षम करतात. आम्हाला ही मोहिम लाँच करण्याचा अभिमान वाटतो. जी निदर्शनास आणते की, खाजगी व सुरक्षित मेसेजिंग व्यक्तींच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि व्हॉट्सअॅप विशेषत: घरापासून व प्रियजनांपासून दूर राहणाऱ्या व्यक्तींकरिता कनेक्टेड राहण्यासाठी सुरक्षित असू शकते.' - व्योम प्रशांत, संचालक कंझ्युमर मार्केटिंग