नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खराब झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागानं सूर्यप्रकाश आणि जोरदार वाऱ्यामुळे राजधानी दिल्लीतील प्रदूषण कमी झालं आहे. मात्र तापमानातही घट होत आहे. सध्या दिल्लीतील कमाल तापमान 27.66 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20.28 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. त्यामुळे हळूहळू थंडीचा जोर वाढत असून ही सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बाब आहे. विशेष म्हणजे वायू प्रदूषणाबाबत दिल्लीतील नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) रविवारी 278 वर पोहोचला होता. मात्र जोरदार वारं आणि कमी आर्द्रता यामुळे त्यात सुधारणा झाली.
वायू प्रदूषणाचा शाळांना जोरदार फटका : देशाच्या राजधानीत होत असलेल्या वायू प्रदूषणामुळे मोठी खळबळ उडाली. रविवारी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) रविवारी 278 वर पोहोचला. त्यानंतर सोमवारी सकाळी त्यात थोडी सुधारणा झाली. सोमवारी सकाळी दाट धुकं पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. रात्रीही अशीच परिस्थिती कायम राहणार असून दिवसभर आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज दिल्लीत कमाल तापमान 23.68 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 15.05 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) रविवारी 278 वर पोहोचल्यानं तो 'खराब' श्रेणीत गणला गेला. मात्र अगोदरच्या दिवशी 334 इतका गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आला होता. तो 'गंभीर' श्रेणीत मोडतो. मात्र 334 AQI वरून 278 वर हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आल्यानं त्यात सुधारणा झाली. तरीही दिल्लीत हवेची गुणवत्ता चिंताजनक आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली असून ऑनलाईन वर्ग भरवण्यात येत आहेत.
पूर्व प्राथमिक शाळा ते 12 वी पर्यंतचे वर्ग बंद : नोएडामधील हवा गुणवत्ता निर्देशांक घसरल्यानं शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नोएडा जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर सोमवारी ऑनलाइन वर्ग सुरू ठेवण्यात आले आहेत. दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक AQI पातळी 450+ अंकावर गेली. त्यामुळे प्रशासनाकडून आदेश जारी करण्यात आले. या आदेशानुसार किमान 25 नोव्हेंबरपर्यंत सर्व वर्गांना सुट्टी जाहीर करण्यात आली. फक्त ऑनलाईन वर्ग घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) च्या उल्लंघनामुळे पूर्व प्राथमिक ते 12 वी पर्यंतचे वर्ग बंद करण्याबाबत गौतम बुद्ध नगरचे जिल्हाधिकारी यांनी आदेश जारी केले. गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील सर्व शाळांना 25 नोव्हेंबरपर्यंत वरील आदेशाचं पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असं जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे, अशी माहिती शाळांचे जिल्हा निरीक्षक धरमवीर सिंग यांनी दिली.
हेही वाचा :