नवी दिल्ली Triple Talaq : राजधानी दिल्लीत तिहेरी तलाकची दोन प्रकरणं समोर आली आहेत. दोन्ही महिलांचा आरोप आहे की, त्या 2019 मुस्लिम विवाह कायदा आणि कौटुंबिक हिंसाचार प्रकरणाच्या सुनावणीसाठी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात आल्या होत्या. परंतु त्यांच्या पतींनी त्यांना न्यायालयाबाहेरच घटस्फोट दिला. दोन्ही घटनांमध्ये पीडित महिलांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
पहिलं प्रकरण : डीसीपी मनोज कुमार मीना यांनी सांगितलं की, 24 जानेवारी 2024 रोजी दोन महिलांच्या तक्रारीवरून तिहेरी तलाकचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले. पहिल्या प्रकरणात महिलेनं सांगितलं की, तिचा 2019 मध्ये मुस्लिम विवाह कायद्यानुसार विवाह झाला होता. महिलेनं रसायनशास्त्रात पीएचडी केली आहे. तक्रारदार महिलेनं सांगितलं की, 11 जुलै 2023 रोजी तिच्या पतीनं तिला तिहेरी तलाक दिला. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, महिलेच्या पतीनं घटस्फोटाचा गुन्हा दाखल केलेला नाही.