लुधियाना : पंजाबमधील लुधियाना पश्चिम जिल्ह्यातील आम आदमी पार्टीचे आमदार गुरप्रीत गोगी यांचा काल (10 जानेवारी) रात्री त्यांच्या घरात गोळी लागल्यानं मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोगी यांच्या डोक्यात गोळी लागली होती. गोळी लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पोलिस उपायुक्त (डीसीपी) जसकरण सिंह तेजा यांनी सांगितलं की, घटनेचा तपास सुरू आहे. दरम्यान, गोगी 2022 मध्ये आम आदमी पक्षात सामील झाले होते. त्यांनी लुधियाना विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दोन वेळा माजी आमदार भारतभूषण आशू यांचा पराभव केलाय.
AAP MLA Gurpreet Gogi shot dead in Ludhiana
— ANI Digital (@ani_digital) January 10, 2025
Read @ANI Story | https://t.co/jlx4I6HMRZ#AAP #GurpreetGogi #Ludhiana pic.twitter.com/HzArlDYZab
बातमी अपडेट होत आहे...