कर्नाटक- विजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरातील जंगलात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या पथकाने नक्षलविरोधी कारवाई सुरू केलीय. या कारवाईदरम्यान रविवारी सकाळी राष्ट्रीय उद्यान परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झालीय. ही चकमक अजूनही अधूनमधून सुरूच आहे.
जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक : मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. ऑटोमेटिक शस्त्रेसुद्धा जप्त करण्यात आलीत. भोपाळपट्टणमच्या परिसरातील बांदेपारा-कोरंजेडच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सकाळपासून अधूनमधून गोळीबार सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या चकमकीला दुजोरा दिलाय. ते म्हणाले की, सुरक्षा दल शोध मोहिमेत आहेत आणि ऑपरेशन संपल्यानंतर सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
तीन नक्षलवादी मारले गेल्याचं वृत्त : या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलीय. नक्षलवादी कारवायांबाबत या भागात अनेक वेळा मोठी ऑपरेशन्स करण्यात आली. सध्या शोध मोहीम सुरू असून, सुरक्षा दल पूर्ण सतर्कतेने परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आहे.