इटावा (उत्तर प्रदेश) Accused Escaped Jumping from Train: ट्रान्झिट रिमांडवर घेतलेले तीन आरोपी यूपीच्या इटावा जिल्ह्यातील इक दिल कालव्याजवळून फरार झाले. सर्व गुन्हेगारांना मुंबई पोलीस (Mumbai Police) बंदोबस्तात प्रतापगड येथून रेल्वेने मुंबईत घेऊन जात होते. मात्र, हे सर्व आरोपी चालत्या रेल्वेतून उड्या मारून फरार झाले. यानंतर इटावा जिल्हा पोलीस त्यांचा शोध घेत आहे. परिसरात सखोल शोधमोहीम राबवली जात आहे.
विविध ठिकाणी गुन्हे दाखल: तीन कुख्यात आरोपी मुंबईसाठी गाझीपूर वांद्रे रेल्वेने पोलीस घेऊन जात होते. इटावा येथील इक दिल कालव्याजवळ ही रेल्वे येताच या सर्व आरोपींनी रेल्वेतून उड्या मारत फरार झाले. या तीनही आरोपींवर महाराष्ट्रासह इतर राज्यातही विविध गुन्हे दाखल आहेत. आरोपी फरार झाल्याची माहिती मिळताच त्यांना पकडण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांकडून सखोल शोधमोहीम राबवण्यात येत आहे.
नालासोपारा येथे आणत होते पोलीस : ट्रान्झिट रिमांडवर तीन आरोपी गाझीपूर वांद्रे मेल एक्स्प्रेस ट्रेनने (ट्रेन क्रमांक 20942) मुंबईतील नालासोपारा येथे नेले जात होते, अशी माहिती मिळत आहे. पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या तीन गुन्हेगारांवर अनेक जिल्ह्यांत गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इटावा जिल्ह्यातील इक दिल स्टेशनजवळ पहाटे 05:45 वाजता या सर्व आरोपींनी रेल्वेमधून उडी मारली आणि तेथून पळ काढला.