how to make homemade lip balm: घरातून बाहेर पडताना अनेक महिला ओठ सुंदर दिवसावे याकरिता लिपस्टिक लावतात. त्यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य वाढते. परंतु, बऱ्याचदा लिपस्टिक कितीही चांगली असली तरी आपले ओठं त्यामध्ये खुलून दिसत नाही. कारण लिपस्टिक खुलून दिसण्यासाठी ओठ देखील छान असणे आवश्यक आहेत. परंतु कितीही काळजी घेतली असता घाम आणि हवामानामुळे आपली त्वचा आणि ओठ कोरडे पडतात. हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात ओठ कोरडे होतात. त्याचबरोबर ओठ फुटतात देखील.
ओठांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी बाजारातील अनेक महागडे प्रोडक्ट आपण खरेदी करतो. परंतु त्याचा पुरेशा प्रमाणात आपल्याला फायदा होत नाही. तसंच केमिकलयुक्त प्रोडक्टसमुळे ओठांवर देखील दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. अनेकदा केमिकलयुक्त उत्पादन वापरल्यामुळे ओठ देखील काळे होतात. अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो की या समस्येचे समाधान कसं करावं. आपल्या याच समस्येचे आज आम्ही निराकरण करणार आहोत. चला तर पाहूया ओठ चांगले ठेवण्यासाठी घरीच नैर्गिकरित्या लिपबाम कसं तयार करावं.
- बीट लिप बाम: बीटचं रस काढा आणि त्याला चांगलं उकळा. यानंतर यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि खोबरेल तेल घाला आणि चांगले मिसळा. आता हे मिश्रण पुन्ही उकळा. मिश्रण घट्ट झालं की ते थंड होऊ द्या. थंड झाल्यावर एका लहान डब्यात किंवा व्हॅसलीनच्या लहान बॉक्समध्ये हे मिश्रण घाला. तुमचे बीट लिप बाम तयार आहे. हे लिपबाम तुम्ही गालावर हलकं ब्लशर म्हणूनही वापरू शकता. हे लॉगलास्टिंग असून यामुळे ओठं देखील गुलाबी दिसतात.
- रोझ लिप बाम: गुलाबाच्या पाकळ्या घ्या आणि त्यांना स्वच्छ धुवून घ्या. आता पाकळ्या बारीक करून घ्या. त्यात खोबरेल तेल, पेट्रोलियम जेली आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल घालून चांगले मिसळा. यानंतर हे मिश्रण १ मिनिट चांगले उकळा. नंतर फिल्टर करा. गाळल्यानंतर उरलेले मिश्रण चांगले फेटून घ्या. आता गुलाबी रंगाचं लिक्विड लिपबाम तयार आहे. तयार झालेलं लिपबाम डब्यात भरून फ्रिजमध्ये थंड व्हायला ठेवा. लिपबाम थंड झाल्यावर ते ओठांवर लावा. यामुळे तुमचे ओठ मऊ आणि गुलाबी दिसणार.
- शिया बटर लिप बाम: एका भांड्यामध्ये शिया बटर आणि मेण एकत्र गरम करून उकळून घ्या. स्पिअरमिंट आवश्यक तेलाचे काही थेंब घाला. शिया बटर लिप बाम लिप बामच्या डब्यात ओतून फ्रीजमध्ये थंड करून तयार आहे. शिया बटर तुमच्या त्वचेला चमक आणण्यास मदत करते.
संदर्भ
https://www.ijfmr.com/papers/2024/4/25355.pdf