जम्मू-काश्मीर Udhampur Terror Attack : भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरील तणावाचं वातावरण अद्याप कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांमध्ये आणि भारतीय जवानांमध्ये चकमक सुरू आहे. आज जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) एका निरीक्षक अधिकाऱ्याला वीरमरण आलंय. दुडू परिसरातील सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला.
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; उधमपूर येथील चकमकीत सीआरपीएफ अधिकाऱ्याला वीरमरण, तीन जवान जखमी - Udhampur Terror Attack - UDHAMPUR TERROR ATTACK
Udhampur Terror Attack : काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचा एक निरीक्षक अधिकारी हुतात्मा झाला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला (Source - ANI)
Published : Aug 19, 2024, 7:38 PM IST
दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर सुरक्षा दलातील जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विट करत दिलीय.