नवी दिल्ली Hearing in SC on Delhi Cm : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. दुसरीकडं आज सर्वोच्च न्यायालयातही अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालय आता अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर 26 जून रोजी सुनावणी घेणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का दिल्याचं स्पष्ट झालं आहे. अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू घोटाळ्यात मनी लाँड्रींग केल्याच्या आरोपात ईडीनं अटक केली आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर अंतरिम स्थगिती :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर दिल्ली उच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे. आज सर्वोच्च न्यायालय अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर सुनावणी पार पडली. दिल्ली उच्च न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांना ट्रायल कोर्टानं दिलेल्या जामीनावर सुनावणी होईपर्यंत स्थगिती दिली. शनिवारी झालेल्या या सुनावणीत निर्णय राखून ठेवण्यात आला. रविवारी अरंविद केजरीवाल यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेत अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर अंतरिम स्थगिती देण्याबाबत आजच सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर आज दिल्ली उच्च न्यायालयात होणार आहे. दुसरीकडं आज सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी पार पडली. या सुनावणीत अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयानं काय दिला निर्णय :अरविंद केजरीवाल यांना ट्रायल कोर्टानं जामीन दिल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयानं या प्रकरणी सुनावणी घेतली. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयानं तपशीलवार आदेशांसाठी हे प्रकरण राखून ठेवत असल्याचं स्पष्ट केलं. याबाबत दोन ते तीन दिवसात निर्णय दिला जाईल, असं उच्च न्यायालयानं सांगितलं. उच्च न्यायालयातील एकल न्यायाधीशांनी ट्रायल कोर्टाच्या जामीन आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली जाईल, असे निर्देश दिले आहेत. दोन ते तीन दिवसांनी या प्रकरणी अंतिम आदेश निघेल, असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं.
ट्रायल कोर्टानं दिली अरविंद केजरीवाल यांना जमानत :दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयानं गुरुवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला. अरविंद केजरीवाल यांना एक लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर हा जामीन देण्याचा आदेश न्यायालयानं दिला होता. मात्र ईडीनं उच्च न्यायालयात धाव घेतल्यानं उच्च न्यायालयानं ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला उच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या वकिलानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेत जामिनावरील स्थगिती हटवण्याची मागणी केली. मात्र आज पार पडलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानंही अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर निर्णय दिला नाही. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं पुढील तारीख दिली आहे.
हेही वाचा :
- अरविंद केजरीवाल यांची आज तिहार तुरुंगातून सुटका होणार की नाही? ईडी जामिनाच्या निर्णयाला आव्हान देण्याची शक्यता - Delhi Liquor Policy Case
- अरविंद केजरीवाल यांना जामीन : दारू घोटाळ्यात मोठा दिलासा; ईडीची स्थगितीची मागणीही फेटाळली - Arvind Kejriwal Gets Bail
- "देश वाचवण्यासाठी मी तुरुंगात जातोय"; 21 दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं तिहार कारागृहात आत्मसमर्पण - CM Arvind kejriwal surrendering