ETV Bharat / bharat

आबुझमाड चकमक : आबुझमाडच्या जंगलात आणखी एका नक्षलवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश - ABUJHMAD ENCOUNTER UPDATE

आबुझमाडच्या जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांच्या जवानात चकमक उडाली. या चकमकीत आतापर्यंत 5 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं. आज आणखी एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळला.

Abujhmad Encounter Update
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2025, 2:10 PM IST

रायपूर : छत्तीसगडमधील आबुझमाडच्या जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये मोठी चकमक उडाली. या चकमकीत सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं असून 5 नक्षलवाद्यांना सुरक्षा दलानं ठारे केलं आहे. रविवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी चार गणवेशधारी नक्षलवाद्यांचे मृतदेह जंगलातून बाहेर काढले आहेत. तर आज आणखी एका नक्षलवाद्याचा मृतदेह सुरक्षा दलाच्या जवानांना आढळून आला आहे. या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांचाही खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. आता मारण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची संख्या 5 झाली असून जंगलात आणखीही नक्षलवाद्यांचा मृतदेह मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आबुझमाड चकमकीत 5 नक्षलवाद्यांचा खात्मा : आबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे. या चकमकीत 5 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं. याबाबत बोलताना बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी म्हणाले, की "शनिवारी आबुझमाडमध्ये नक्षलवाद्यांची हालचाल दिसून आल्याची माहिती खबऱ्यानं दिली होती. या माहितीवरुन सुरक्षा दलानं दंतेवाडा, नारायणपूर, बस्तर आणि कोंडागाव या 4 जिल्ह्याचे डीआरजी आणि एसटीएफचे संयुक्त पथक नक्षलवाद्यांच्या शोधमोहिमेसाठी रवाना करण्यात आलं. यावेळी जानेवारीपासून नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक होत होती. या चकमकीत 5 जानेवारीला जवानांनी घटनास्थळावरून चार गणवेशधारी नक्षलवाद्यांचे मृतदेह बाहेर काढले. यामध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्यानंतरही ही चकमक सुरूच होती. आज 6 जानेवारीला आणखी एका नक्षलवाद्याचा मृतदेह जंगलात आढळून आला आहे."

आबुझमाड चकमकीची माहिती देताना पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. (Reporter)

एका हवालदाराला वीरमरण : सुरक्षा दलाच्या जवानांनी नक्षलवाद्यांना घेरुन नक्षलावाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत एका हवालदाराला वीरमरण आलं आहे. सन्नुराम करम असं वीरमरण आलेल्या हवालदाराचं नाव आहे. सन्नुराम करम हे मिर्तूर पोलीस ठाण्याच्या टिमनार गावचे रहिवासी होते. रविवारी पोलीस कवायत मैदानावर वीरमरण आलेल्या सन्नुराम करम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी, डीआयजी कमलोचन कश्यप, जिल्हाधिकारी मन्यक चतुर्वेदी, आमदार चैत्राम अटामी आणि जिल्हा पंचायतचे सीईओ यांनी भावनिक होत जड अंतकरणानं वीर जवानाला निरोप दिला.

दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचे नक्षलवादी ठार : सुरक्षा दलाच्या जवानांसोबत चकमक उडालेले नक्षलवादी हे दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी ( DKSZC ) आणि PLGA प्लाटून क्रमांक 32 च्या वरिष्ठ कॅडरचे होते. या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. जवानांनी घटनास्थळावरून एक-47, SLR सारखी स्वयंचलित शस्त्रं जप्त केली आहेत. जवान परत आल्यानंतर सविस्तर माहिती देण्यात येईल,असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. छत्तीसगडमध्ये पोलिसांबरोबरील चकमकीत १० नक्षलवादी ठार, अनेक शस्त्रे जप्त
  2. निवडणुकीपूर्वी सुरक्षा दलाची गडचिरोलीत मोठी कारवाई; चकमकीत पाच नक्षलवादी ठार
  3. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई; 36 नक्षलवाद्यांचा केला खात्मा - Chhattisgarh Naxalites Encounter

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.