ETV Bharat / state

मेळघाटातील सीताफळ रबडी चवदार ; आदिवासी महिलांना मिळाला नवा रोजगार - SITAFAL RABDI IN MELGHAT

मेळघाटातील आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करण्यात येतात. आता मेळघाटात 'सीताफळ रबडी' हा नवा रोजगार नागरिकांना खुणावत आहे.

Sitafal Rabdi In Melghat
मेळघाटातील सिताफळ रबडी (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2025, 1:22 PM IST

Updated : Jan 6, 2025, 3:13 PM IST

अमरावती : जंगलातील सीताफळाचा गर आणि त्यात दुधाचा छान खवा घालून चवदार अशी रबडी चिखलदरा लगत असणाऱ्या शहापूर येथील स्फूर्ती क्लस्टरच्या माध्यमातून बनविली जात आहे. सीताफळ रबडीचा मेळघाटातील हा पहिलाच प्रयोग असून हा प्रयोग खरंतर आदिवासी आणि गवळी समाजातील महिलांना चांगला रोजगार देणारा ठरतोय. मेळघाटातील या चवदार सीताफळ रबडी संदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.

मेळघाटात सीताफळाचं भरघोस उत्पादन : मेळघाटच्या जंगलात सीताफळाची लाखो झाडं आहेत. चिखलदरा परिसरात मोथा, आमझरी, खटकाली या गावांसह मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या धामणगाव गढी, बागलिंगा या परिसरात सिताफळाच्या झाडांची संख्या असंख्य आहे. सीताफळ हे नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत येणार फळ असलं, तरी मेळघाटात मात्र केवळ नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येच सीताफळ उपलब्ध होतात. कुठल्याही प्रकारच्या रसायनाचा वापर न करता ही जंगली सीताफळं अतिशय पौष्टिक आहेत.

मेळघाटातील सिताफळ रबडी चवदार ; आदिवासी महिलांना मिळाला नवा रोजगार (reporter)

सीताफळ रबडीमुळे महिलांना फायदा : नोव्हेंबर डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत पहाटे उठून जंगलातील सीताफळं तोडून आणणं आणि त्यानंतर चिखलदरा परिसरातील विविध टुरिस्ट पॉईंटवर सीताफळाची विक्री करणाऱ्या महिलांना विशेष असे पैसे मिळत नाहीत. चिखलदरा लगत शहापूर या ठिकाणी असणाऱ्या स्फूर्ती क्लस्टर या प्रकल्पाचे संचालक सुनील भालेराव यांनी सीताफळाचा गर काढून त्याद्वारे काही नवा प्रयोग करता येईल का, असा विचार केला. त्यानंतर त्यांनी सीताफळाचा गर आणि खवा एकत्रित करून खास सीताफळ रबडीचा प्रयोग यशस्वी केला. "सीताफळ रबडीसाठी आदिवासी महिलांकडून मोठ्या प्रमाणात सीताफळ खरेदी करण्यात आलेत. विशेष म्हणजे महिलांना दिवसभर सीताफळ विक्रीसाठी लागणारे कष्ट यामुळे कमी झालेत. जंगलातून तोडून आणलेले सिताफळ महिलांनी थेट आमच्या केंद्रावर आणून दिलेत," असं सुनील भालेराव यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितलं.

अशी तयार झाली सीताफळ रबडी : "सीताफळाचं बी आणि त्याचा गर वेगळा करून काहीतरी नवा प्रयोग करण्याचं ठरवलं. बी वेगळी केल्यावर गर आमच्याकडं असणाऱ्या एका मोठ्या मशीनमध्ये टाकून त्याला फेटण्यात आलं. मात्र या मशीनमध्ये हा गर हवा तसा फेटला गेला नाही. यामुळे आम्ही यासाठी खास नवीन मशीन आणलं. या मशीनमध्ये विशिष्ट अशा तापमानावर सीताफळाचा गर चांगला फेटला जातो. सीताफळाच्या या गरामध्ये परिसरात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारा खवा आम्ही, त्यात टाकला आणि सीताफळ रबडी तयार केली," असं सुनील भालेराव म्हणाले.

Sitafal Rabdi In Melghat
मेळघाटातील सिताफळ रबडी (Reporter)

सीताफळाचा दोन टन गर : "सध्या सीताफळाचा दोन टन गर उपलब्ध असून यावर प्रक्रिया करून सीताफळ रबडी तयार केली जात आहे. अमरावती शहरात शासनाच्या मेळघाट हाट या ठिकाणी सीताफळ रबडी विक्रीसाठी पाठवली जात असून चिखलदरा या ठिकाणी देवी पॉईंट, भीम कुंड, गाविलगड किल्ला अशा महत्त्वाच्या टुरिस्ट पॉईंटवर सीताफळ रबडी प्रक्रियेशी जोडलेल्या महिला स्वतः स्टॉल लावून सीताफळाची विक्री करतात. जंगलातून सीताफळ तोडून आणून या ठिकाणी विकणं आणि या ठिकाणी तयार झालेली सीताफळ रबडी बाहेर पर्यटकांना विकून महिलांना बऱ्यापैकी रोजगार मिळतो आहे," अशी माहिती भालेराव यांनी दिली.

Sitafal Rabdi In Melghat
मेळघाटात सिताफळ रबडी बनवताना महिला (Reporter)

सीताफळ आणि खवा दोघांनाही एकाच ठिकाणी भाव : "मेळघाटातील दर्जेदार सीताफळाला चांगली मागणी आहे. चिखलदरा येथील सीताफळ परतवाडा आणि अमरावतीच्या बाजारात जातात. या परिसरात गवळी बांधवांकडं अतिशय दर्जेदार खवा तयार होतो. हा खवा देखील परतवाडा अकोट आणि अमरावतीच्या बाजारात गवळी बांधव विकायला नेतात. सीताफळ रबडी हा प्रयोग यशस्वी झाल्यानं आता पुढच्या वर्षी आम्ही सीताफळाबरोबरच खवा देखील मोठ्या प्रमाणात खरेदी करू. सीताफळाच्या माध्यमातून आदिवासी महिला आणि खव्याच्या माध्यमातून गवळी समाजातील महिलांना चांगला आर्थिक फायदा भविष्यात मिळेल," असा विश्वास सुनील भालेराव यांनी व्यक्त केला.

या गावातील महिलांचा सहभाग : "सीताफळ रबडीचा प्रयोग पहिल्याच वर्षी होत आहे. सुरुवातीला चिखलदरासह लगतच्या खटकांनी, आमझरी शहापूर या गावातील दीड दोनशे महिलांनी जंगलातून सीताफळ तोडून आणलेत. पुढच्या वर्षी आणखी काही गावातील महिला जंगलातील सीताफळ तोडून आमच्याकडं आणतील. सीताफळ तोडून आणणाऱ्या महिलांना दिवसभर सीताफळ विक्री करत बसण्यापेक्षा आमच्याकडं सीताफळ आणून दिल्यानं कमी वेळात त्यांना चांगला मोबदला मिळतो. याबरोबरच रबडी विकूनही त्यांना अधिक दोन पैसे मिळतात. या उद्योगात आणखी महिलांना जोडू," असं मीनाक्षी भालेराव यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. मेळघाटात गवळी बांधवांची घरवापसी; गुरांना चारा, पाणी मिळावं यासाठी सहा महिन्यासाठी केलं होतं स्थलांतर - CATTLE OWNERS RETURNED IN MELGHAT
  2. जीवन वाचविणारे पाणीच ठरतेय मृत्यूला आमंत्रण: मेळघाटातील गामस्थांना मूत्रपिंडाचे आजार, अनेकांचे मृत्यू - Amravati water issue
  3. काय सांगता! मेळघाटात चक्क आंब्याच्या झाडाला दाढी; दाढीवाला आंबा अशी खास ओळख

Last Updated : Jan 6, 2025, 3:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.