ETV Bharat / bharat

एचएमपीव्ही विषाणू जुनाच असल्यानं घाबरू नये, दोन रुग्ण कर्नाटकात आढळल्यानंतर डॉक्टरांची पोस्ट चर्चेत - HMPV VIRUS INDIA

बंगळुरूमध्ये एचएमपीव्हीचे दोन रुग्ण आढळळे आहेत त्यामुळे देशभरात चिंता वाढली आहे. या रोगाबाबत शंकानिरसन करणारी डॉ. प्रिया प्रभू यांची पोस्ट चर्चेत आली आहे.

HMPV  virus News
प्रतिकात्मक-एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2025, 11:00 AM IST

Updated : Jan 6, 2025, 12:21 PM IST

बंगळुरू- चीनसह मलेशियामधील नागरिकांची झोप उडविणारा एचएमपीव्ही ( HMPV virus News ) भारतात शिरकाव करणार असल्यानं चिंता वाढली आहे. देशाची सिलिकॉन व्हॅली अशी ओळख असलेल्या बंगळुरूमध्ये आठ महिन्याच्या बाळासह दुसऱ्या लहान मुलाला एचएमपीव्हीची लागण झाली आहे.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (ICMR) कर्नाटकात ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसचे (HMPV) दोन प्रकरणे शोधून काढली आहेत. देशभरातील श्वसनाच्या आजारांवर नजर ठेवण्यासाठी आयसीएमआरकडून प्रयत्न सुरू आहेत, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे.

2019 मध्ये वुहानमधून पसरलेल्या कोविड-19 ने जगाला श्वास घेणं कठीण गेलं होता. 5 वर्षांनंतर चीनमधून पुन्हा दुसरा विषाणू जगभरात पसरत आहे. ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस किंवा एचएमपीव्ही नाव असलेला हा आरएनए विषाणू आहे. त्याची लक्षणे कोविड-19 सारखीच असून त्यामध्ये सर्दी, ताप, वाहणारे नाक या लक्षणाचा समावेश आहे. या विषाणुचा 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर सर्वाधिक परिणाम होतो. हा विषाणू खोकल्यामुळे आणि शिंकण्यानं पसरतो. रुग्ण गंभीर झाला तर त्याला ब्राँकायटिस आणि न्यूमोनियाची लागण होते. कोरोनाच्या धसक्यानंतर चीनकडून HMPV पसरू नये, यासाठी काळजी घेण्यात येत आहे.

  • कर्नाटक सरकारनं ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) रोगाच्या प्रसाराच्या धोक्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कर्नाटकातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने राज्यातील श्वसन संसर्गाच्या संबंधित आकडेवारीचं विश्लेषण केले आहे. त्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2024 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत नोंदवलेल्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली नाही.

काय आहेत मार्गदर्शक सूचना

  • स्वत:चे रक्षण करण्यासाठी आणि संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करा.
  • नागरिकांनी खोकताना, शिंकताना तोंड आणि नाक रुमाल हे टिश्यू पेपरनं झाकावे.
  • साबण आणि अल्कोहोल-आधारित सॅनिटायझरने हात धुवावे. गर्दीची ठिकाणे टाळावे.
  • ताप, खोकला, शिंकताना सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहावे.
  • आजारी असल्यास इतरांशी संपर्क मर्यादित ठेवावा. भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक अन्न खाण्याचा देखील सल्ला कर्नाटकच्या आरोग्य मंत्रालयानं सल्ला दिला.
  • वापरलेलं टिश्यू पेपर आणि रुमाल पुन्हा वापरू नये. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वत:हून औषध घेऊ नये.

रुग्ण संख्या वाढल्याचा भास होऊ शकतो- मिरजच्या डॉक्टर प्रिया प्रभू यांनी सोशल मीडियातील विषाणुबद्दल जनजागृती करणारी महत्त्वाची पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं, "HMPV हा 50-60 वर्षे जुना विषाणू असून गेल्या 25 वर्षात याविषयी खूप सारे संशोधन झालेले आहे . विषाणू कोणताही असला तरी उपाय हे सारखेच आहेत. सर्वत्र HMPV विषाणूची चर्चा सुरू झाल्यानंतर रुग्णालये ही HMPV ची तपासणी स्वतःहून वाढवतील. तेव्हा अचानक आपल्याला संख्या जास्त आहे, असा भास होऊ शकतो".

चीनचं नाव आहे म्हणून घाबरून जाऊ नका- कोरोनासारखी देशात पुन्हा स्थिती होईल, या विचारानं अनेकांची चिंता वाढली आहे. याचं शंकानिरसन डॉ. प्रिया यांनी पोस्टमध्ये करताना म्हटलं, " बंगळुरूमधील आठ महिन्याचे बाळ कधीही प्रवासाला गेलेले नाही. तसेच कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रवाशाच्या संपर्कातही ते आलेले नाही. त्यामुळे हे आजाराचे प्रकरण भारतामधीलच असू शकते. तपासण्या वाढवल्यावर देशात रुग्ण वाढताना दिसल्यानं विनाकारण भीती वाढेल. मात्र, आजाराचे रुग्ण खरेच वाढत आहेत की अलर्टमुळे तपासणी केल्यानं वाढत आहेत? यातील फरक समजून घ्यायला हवा. भारत सरकारनंदेखील हा आजार जुना असल्यानं आणि सरकारकडून नियमित सर्वेक्षण सुरू असल्याने याविषयी चिंता करू नये, अशा पद्धतीचे परिपत्रक जाहीर केलेले आहे. केवळ चीनचं नाव आहे म्हणून घाबरून जाऊ नका". साधे उपाय केले तर श्वसन संस्थेच्या कोणत्याही विषाणूपासून सुरक्षा मिळू शकते. जुन्या विषाणूमुळे महासाथ येण्याची शक्यता खूप कमी असते, असे डॉ. प्रिया प्रभू यांनी म्हटलं.

हेही वाचा-

Last Updated : Jan 6, 2025, 12:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.