ETV Bharat / entertainment

संगीतकार एआर रहमान यांचा वाढदिवस, जाणून घ्या त्याच्याबद्दल रंजक गोष्टी... - AR RAHMAN BIRTHDAY

संगीतकार एआर रहमान 6 जानेवारी रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगी आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगणार आहोत .

Musician AR Rahman
संगीतकार एआर रहमान (musician ar rahman - instagram)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 6, 2025, 1:10 PM IST

मुंबई - प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान हे 6 जानेवारी रोजी त्यांचा 58वा वाढदिवस साजरा करत आहे. हा दिवस त्याच्यासाठी खूप विशेष आहे. त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक हिट गाणी दिली आहेत. रहमान यांना चित्रपटसृष्टीत सुरांचा राजा देखील म्हटले जाते. हिंदीशिवाय त्यांनी भारतातील इतर अनेक भाषांमधील चित्रपटांनाही संगीत दिलंय. रहमान हे गोल्डन ग्लोब पुरस्कारानं सन्मानित होणारे पहिले भारतीय आहेत. रहमान हे 'स्लम डॉग मिलेनियर' या ब्रिटिश भारतीय चित्रपटासाठी तीन ऑस्कर नामांकन मिळवणारे पहिले भारतीय आहे. यासोबतच चित्रपटाच्या 'जय हो' गाण्याला सर्वोत्कृष्ट साउंडट्रॅक संकलन आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट गीत या विभागांमध्ये दोन ग्रॅमी पुरस्कार देखील त्यांना मिळाले आहेत.

एआर रहमान यांचे जुने नाव : एआर रहमान यांचा जन्म 6 जानेवारी 1967 रोजी चेन्नई, तामिळनाडूमध्ये झाला होता. त्याचं आधीचं नाव 'अरुणाचलम शेखर दिलीप कुमार मुदलियार' होते. धर्मांतरानंतर त्यांनी त्याचं नाव अल्लाह रखा रहमान हे ठेवलं होतं. एआर रहमान यांनी फार कमी वयापासून संगीत क्षेत्रात काम सुरू केले होते. त्यांच्या वडीलांच्या निधनानंतर त्यांच्यावर घरातील जबाबदारी आली होती. यानंतर त्यांनी संगीत क्षेत्रात खूप कष्ट केले. आज त्यांनी आपली ओळख जगभरात केली आहे. त्याच्या आवजाची जादू देश-विदेशात असून अनेकजण त्याच्या कॉन्सर्टमध्ये जाऊन त्यांचा सुरेल आवाज ऐकतात.

वडिलांकडून मिळाला संगीताचा वारसा : एआर रहमान यांना त्यांच्या वडिलांकडून संगीताचा वारसा मिळाला आहे. त्यांचे वडील राजगोपाल कुलशेखर हे मल्याळम चित्रपटांचे संगीतकार होते. रहमान हे वडिलांबरोबर म्युझिक स्टुडिओमध्ये तासनतास घालवत होते. या काळात त्यांनी अनेक वाद्ये वाजवणे शिकली. रहमान यांनी मास्टर धनराज यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले आहे. 1991मध्ये रहमान यांनी स्वतः संगीत रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. त्यांनी 1993 मध्ये, दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या 'रोजा' चित्रपटासाठी संगीत दिलं होतं. त्यांनी दिलेलं संगीत खूप लोकप्रिय झालं होतं. हा चित्रपट म्युझिकल हिट ठरला आणि रहमान यांना त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर त्यांनी 'दिल से', 'बॉम्बे', 'ताल', 'जीन्स', 'लगान','पुकार', 'रंगीला','रंग दे बसंती', 'स्वदेश', ' जय हो', 'गजनी', 'हायवे', 'जोधा अकबर' आणि 'रॉकस्टार यासारख्या चित्रपटांना संगीत देऊन चित्रपटसृष्टी जबरदस्त कामगिरी केली. 1997 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त 'माँ तुझे सलाम' हे गाणं त्यांनी गायलं होतं. त्याचा हा अल्बम खूप यशस्वी झाला होता.

बहिणीमुळे धर्म बदलला : संगीतकार एआर. रहमान यांच्या आयुष्यातील वाईट टप्प्यात त्यांच्या बहिणीला गंभीर आजारानं ग्रासलं होतं, डॉक्टरांचे उपचार देखील काम करत नव्हते. यानंतर दिलीप शेखर यांच्या आईला एका मुस्लिम फकीर भेटला. या फकीराच्या प्रार्थनेमुळे रहमानची यांची बहीण निरोगी झाली. यानंतर रहमान यांची इस्लाम धर्मावर श्रद्धा वाढली.

हेही वाचा :

  1. फिल्म इंडस्ट्रीतील 2024मध्ये धक्कादायकपणे विभक्त झालेली सेलिब्रिटी जोडपी...
  2. "ते मला वडिलांसारखे आहेत, थोडी लाज बाळगा", रहमानशी नाव जोडलं गेल्यानं मोहिनी डे झाली भावूक, इमोशनल व्हिडिओ शेअर
  3. एआर रहमानच्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच पत्नी सायरा बानोनं सोडलं मौन, सांगितलं विभक्त होण्याचं कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.