मुंबई Shoaib Malik 2nd Marriage : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकनं तिसरे लग्न केल्याचं समोर आलं आहे. काही दिवसापूर्वी शोएब सानिया मिर्झापासून वेगळे झाल्याच्या बातम्या येत होत्या. शोएबनं पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केलं आहे. शोएबनं लग्न केलेल्या सना जावेदचाही घटस्फोट झाला आहे. सना जावेदनं 2020 मध्ये उमेर जसवालशी लग्न केलं होतं. यानंतर हे उघड झालं, की या जोडप्यामध्ये काही ठीक चाललं नाही. दोघांनीही आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एकमेकांचे फोटो हटवले. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. यावेळीच शोएब मलिकच्या अफेयरच्या बातम्या देखील येऊ लागल्या होत्या.
सानिया मिर्झाची पोस्ट :काही दिवसाआधीसानिया मिर्झानं एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिचा आणि शोएब मलिकचा घटस्फोट झाल्याचा अंदाज अनेकांना लावला होता. सानियानं या पोस्टमध्ये लिहिलं होतं, ''लग्न कठीण आहे, घटस्फोट घेणंही कठीण आहे. तुमची सर्वात कठीण निवड, लठ्ठपणा कठीण आहे. तंदुरुस्त राहणं कठीण आहे. कर्जात अडकणं कठीण आहे. आर्थिकदृष्ट्या शिस्तबद्ध राहणं कठीण आहे. संवाद अवघड आहे. संवाद न करणं कठीण आहे. जीवन कधीही सोपं होणार नाही. हे नेहमीच कठीण असेल.'' सानियानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केलेला कोटमध्ये हुशारीनं निवड करण्यास सांगितलं होते.