महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

फिल्मी दुनियेत रामोजी रावांचाच दबदबा; 'ईटीव्ही मराठी'च्या माध्यमातून दिल्या सुपरहिट मालिका - Ramoji Rao passed away - RAMOJI RAO PASSED AWAY

Ramoji Rao Passed Away : 'रामोजी फिल्म सिटी'चे संस्थापक रामोजी राव यांचं शनिवारी (8 जून) सकाळी निधन झालं. त्यांनी उषा किरण मुव्हीजच्या बॅनरखाली अनेक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केलीय. त्यांनी तेलुगु व्यतिरिक्त इतर भाषांमध्येही चित्रपट तयार केले. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालंय.

Ramoji Rao
रामोजी राव (ETV BHARAT MH Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 8, 2024, 9:26 PM IST

हैदराबाद Ramoji Rao Passed Away :'रामोजी फिल्म सिटी'चे सर्वेसर्वा रामोजी राव यांचं शनिवारी निधन झालं. त्यांच्या निधनानं भारतीय माध्यम क्षेत्रात पोकळी निर्माम झाली. तसंच त्यांनी चित्रपट निर्मितीमध्येही मोठं योगदान दिलं आहे. क्वचितच असा तेलुगु भाषिक व्यक्ती असेल, ज्यानं 'ई उषा किरानालू' हे प्रसिद्ध गाणं ऐकलं नसेल. रामोजी राव यांनी 'उषा किरण मुव्हीज'च्या बॅनरखाली अनेक उत्कृष्ट व सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करून चित्रपटसृष्टीबद्दलची त्यांची आवड जगाला दाखवून दिली.

उषा किरण मुव्हीज'ची स्थापना : 'मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स'च्या माध्यमातून रामोजी राव यांनी शेकडो तेलुगूसह इतर भाषेतील चित्रपटांचं वितरण केलंय. रामोजी राव यांनी चित्रपटाच्या शूटिंगसाठी सर्वात योग्य असलेल्या 'रामोजी फिल्म सिटी'ची स्थापना करून चित्रपट उद्योगाला अमूल्य सेवा दिली. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. चित्रपट हा कलात्मक व्यवसाय आहे, असं ते कायम म्हणत होते. रामोजी राव यांनी कायमच दर्जेदार, मनोरंजक, माहितीपूर्ण चित्रपट बनवण्याच्या निर्धारानं 'उषा किरण मुव्हीज'ची स्थापना केली होती.

'उषा किरण मूव्हीज'ची 2 मार्च 1983 रोजी स्थापना : 'उषा किरण मूव्हीज'ची स्थापना 2 मार्च 1983 रोजी करण्यात आली होती. अभिनेत्यांपेक्षा कथेवर विश्वास ठेवून 'उषा किरण मुव्हीज'च्या माध्यमातून 85 हून अधिक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. नायकांवर अवलंबून न राहता कथांवर रामोजी रावांचा विश्वास होता. 1984 मध्ये, प्रसिद्ध विनोदी दिग्दर्शक जंध्याला यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी नरेश आणि पूर्णिमा यांच्यासोबत 'श्रीवारीकी प्रेमलेखा' चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रचंड यश मिळालं. आकर्षक कथा काल्पनिक कथांमधून जन्माला येत नाहीत तर वास्तविक जीवनातून जन्माला येतात, हे रामोजी राव यांनी दाखवून दिलं. त्यांचा 'मयुरी' हा चित्रपट एका हिंदी मासिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीवर आधारित होता. या चित्रपटात सुधा चंद्रन यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

चित्रपटांचं कौतुक : राष्ट्रीय खेळाडू अश्विनी नचप्पा यांच्यावरील चरित्रात्मक चित्रपट 'मौना पोराटोम' आणि 'अश्विनी' यांसारख्या वास्तविक घटनांवर आधारित चित्रपट बनवून रामोजी रावांनी आपली खास शैली दाखवली. 'कांचना गंगा', 'प्रतिघटना', 'नुववे कवळी', 'चित्रम', 'आनंदम' आणि 'नाचवुले' हे चित्रपट 'उषा किरण मुव्हीज' निर्मित अनेक हिट चित्रपटांपैकी आहेत. प्रॉडक्शन हाऊसनं स्वतःला तेलुगु चित्रपटांपुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर कन्नड, तामिळ, मराठी, इंग्रजी भाषांमध्ये 85 चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपटांचं केवळ प्रेक्षकच नव्हे, तर पुरस्कार समित्यांकडूनही कौतुक केलं जातं. 'श्रीवारीकी प्रेमलेखा', 'कांचना गंगा', 'मयुरी', 'प्रतिघटना', 'तेजा' आणि 'मौना पोराटोम' या चित्रपटांना सरकारी पुरस्कार आणि नंदी पुरस्कार देण्यात आले. सुधा चंद्रन यांना 'मयुरी'मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'नुववे कवळी'ला सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. श्रीकांत, विनोद कुमार, चरण राज, यमुना, ज्युनियर एनटीआर, उदय किरण, तरुण, कल्याण राम, रीमा सेन, श्रिया, जेनेलिया आणि तनिश यांच्यासह उषा किरणच्या चित्रपटांमधून अनेक कलाकारांची ओळख प्रेक्षकांना झाली.

अनेक मालिका हिट : प्रसिद्ध गायक एस. जानकी यांना संगीत दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी रामोजी राव यांनी दिली. त्यानंतर जानकी यांनी मल्लिकार्जुन, उषा, गोपिका पौर्णिमा या गायकांची ओळख करून दिली. रामोजी राव यांचा प्रभाव मोठ्या पडद्यापलीकडे दूरचित्रवाणीपर्यंतही पसरलाय. 'ईटीव्ही'नं निर्माण केलेल्या अनेक मालिका हिट झाल्या आहेत. यात 'भागवतम', 'अन्वेशीत', 'अंदामावुलु', 'अडापिल्ला', 'नागस्त्रम' आणि 'अंतरंगलु' या हिट मालिकांचा समावेश आहे. 'ईटीव्ही'नं 'पडूथा ठेगा', 'जबरदस्थ' आणि 'धी' सारखे लोकप्रिय कार्यक्रमही सादर केले आहेत.

हे वाचलंत का :

  1. कोल्हापूरशी जुळली होती रामोजी रावांची नाळ; 90 च्या दशकात ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओला दिली होती भेट - Ramoji Rao Passed Away
    रामोजी राव यांच्या निधनानं 'फिल्मसिटी' झाली पोरकी! 'ईटीव्ही परिवारावर' दु:खाचा डोंगर; रामोजी फिल्मसिटीतून लाईव्ह - Ramoji Rao Passed Away
  2. रामोजी राव यांनी माध्यम क्षेत्रात कशी क्रांती घडविली? वर्तमानपत्र ते डिजीटल माध्यमांमध्ये उमटविला अमीट ठसा - Ramoji Rao news

ABOUT THE AUTHOR

...view details