चंदीगड Ram Rahim Furlough : सिरसा डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम याला साध्वी बलात्कार आणि खून प्रकरणात अटक करण्यात आलं आहे. राम रहीम याला पुन्हा एकदा कारागृहातू सुटी देण्यात आली आहे. गुरमीत राम रहीमला 21 दिवसाची फर्लो रजा मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे आज सायंकाळी 06.30 वाजता गुरमीत राम रहीम याला पोलीस बंदोबस्तात बाहेर काढण्यात येणार आहे. गुरमीत राम रहीम हा उत्तरप्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बर्नवा आश्रमात सुट्टी घालवणार आहे. गुरमीत राम रहीम हा 2017 पासून रोहतक न्यायालयात बंदिस्त आहे.
राम रहीमनं उच्च न्यायालयाकडं मागितली होती फर्लो रजा :गुरमीत राम रहीम याला साध्वी बलात्कार आणि खून प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मात्र गुरमीत राम रहीम याला वारंवार कारागृहातील सुटी देण्यात येत असल्यानं मोठा वाद होत आहे. त्यामुळे गुरमीत राम रहीम पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. गुरमीत राम रहीम यानं याचिका दाखल केल्यानंतर पंजाब हरियाणा उच्च न्यायालयानं याबाबत सरकारला प्रादिकरणाच्या नियमांच्या आधारे फर्लो किवा पॅरोल मंजूर करण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे राज्य सरकारनं केवळ गुरमीत राम रहीमचं नाही, तर खून आणि बलात्कारासारख्या खटल्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या 80 हून अधिक बंदीवानांना नियमानुसार पॅरोल किंवा फर्लो रजेचा लाभ देण्यात आला आहे, असं स्पष्ट केलं.
शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीनं दाखल केली याचिका : गुरमीत राम रहीम याच्या वतीनं अधिकाऱ्यांना फर्लोसाठी अर्ज देण्यात आला आहे. मात्र उच्च न्यायालयानं दिलेल्या 29 फेब्रुवारीच्या स्थगिती आदेशामुळे या याचिकेचा विचार झाला नाही. शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीनं (SGPC) दाखल केलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचलं. या याचिकेत हरियाणा सरकारनं बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवूनही गुरमीत राम रहीमला वारंवार पॅरोलवर किंवा फर्लोवर सोडल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला.