हैदराबाद : ब्लिंकिट भारतात 10 मिनिटांची बेसिक लाइफ सपोर्ट (BLS) रुग्णवाहिका सेवा सुरू करत आहे. क्विक कॉमर्स कंपनीनं गुरुवारी ही माहिती दिली. सध्या ही सेवा गुरुग्राममध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या येथे पाच रुग्णवाहिका धावत आहेत. ते ऑक्सिजन सिलिंडर आणि ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर (AED) सह अत्यावश्यक जीवन समर्थन उपकरणांनी सुसज्ज आहेत. शक्य तितक्या लवकर वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी प्रत्येक BLS रुग्णवाहिकेत पॅरामेडिक, एक सहाय्यक आणि प्रशिक्षित ड्रायव्हर असेल.
Ambulance in 10 minutes.
— Albinder Dhindsa (@albinder) January 2, 2025
We are taking our first step towards solving the problem of providing quick and reliable ambulance service in our cities. The first five ambulances will be on the road in Gurugram starting today. As we expand the service to more areas, you will start… pic.twitter.com/N8i9KJfq4z
ब्लिंकिटची रुग्णवाहिका सेवा : ब्लिंकिटचे सीईओ अल्बिंदर धिंडसा यांनी ट्विटरवर (पूर्वी ट्विटर) एका पोस्टमध्ये BLS रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याची घोषणा केली. मिळालेल्या माहितीनुसार, क्विक कॉमर्स कंपनीचे उद्दिष्ट भारतीय शहरांमध्ये जलद आणि विश्वासार्ह रुग्णवाहिका सेवेची समस्या हाताळण्याचं आहे. ही सेवा सध्या फक्त गुरुग्राममध्ये उपलब्ध असली तरी, ब्लिंकिटचे उद्दिष्ट इतर शहरांमध्येही या सेवेचा विस्तार करण्याचं आहे. वापरकर्त्यांना लवकरच ब्लिंकिट ॲपद्वारे बेसिक लाइफ सपोर्ट (BLS) रुग्णवाहिका बुक करण्याचा पर्याय दिसेल. सीईओच्या म्हणण्यानुसार, ही सेवा पुढील दोन वर्षांत सर्व प्रमुख शहरांमध्ये विस्तारित केली जाईल.
रुग्णवाहिकेत असणार सहाय्यक : प्रत्येक रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडर, एक AED, स्ट्रेचर, मॉनिटर, सक्शन मशीन आणि अर्थातच आपत्कालीन औषधे आणि इंजेक्शन्स असतील. गंभीर वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी, BLS रुग्णवाहिकेमध्ये एक पॅरामेडिक, एक सहाय्यक आणि एक प्रशिक्षित ड्रायव्हर देखील असेल.
10-मिनिटांत डिलिव्हरी सेवा : कंपनीनं रुग्णवाहिका सेवा ग्राहकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणार असल्याचं म्हटलं आहे. कंपनीनं अलीकडच्या काही महिन्यांत ऑफर केलेल्या अनेक उपलब्ध करून दिल्या आहेत. 2024 मध्ये, कंपनीने iPhone 16, Samsung Galaxy S24, PlayStation 5 आणि सोन्या-चांदीच्या नाण्यांसारख्या उत्पादनांची 10-मिनिटांत डिलिव्हरी सुरू केली. याशिवाय कंपनीनं हिसार, जम्मू, लोणावळा आणि रायपूर सारख्या ठिकाणी आपली सेवा विस्तारित केली केलीय.
हे वचालंत का :