ETV Bharat / sports

'अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानं...'; अवार्ड मिळताच स्वप्नीलच्या वडिलांची प्रतिक्रिया - SWAPNIL KUSALE

स्वप्निलला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्याचं जन्मगाव असलेल्या राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावकऱ्यांनी एकच जल्लोष साजरा केला.

Swapnil Kusale Arjuna Award
अवार्ड मिळताच स्वप्नीलच्या वडिलांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Jan 3, 2025, 4:27 PM IST

कोल्हापूर Swapnil Kusale Arjuna Award : तब्बल 72 वर्षाचा वैयक्तिक पदकाचा दुष्काळ संपवून पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा स्टार नेमबाज स्वप्नील कुसाळेनं कांस्यपदक पटकावत साता-समुद्रापार तिरंगा फडकवला. यानंतर केंद्र सरकारकडून ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला असून त्याच्या प्रशिक्षिका दिपाली देशपांडे यांनाही द्रोणाचार्य पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे. स्वप्निलला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्याचं जन्मगाव असलेल्या राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावकऱ्यांनी एकच जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आताशीबाजी आणि साखर पेढे वाटून गावच्या सुपुत्राचं अभिनंदन करण्यात आलं.

स्वप्नपूर्ती झाल्याचं समाधान : केंद्र सरकारकडून खेळात योगदान देणाऱ्या खेळाडूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांना गुरुवारी पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात खेळरत्न पुरस्कार 4 खेळाडूंना तर अर्जुन पुरस्कार 32 खेळाडूंना जाहीर देण्यात आला आहे. स्वप्नील कुसाळेनं 2024 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत भारताला कांस्य पदक जिंकवून दिलं आहे. 1952 मध्ये हेलसिंकी इथं झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेत भारताचे खेळाडू खाशाबा जाधव यांनी कुस्तीत भारताला ब्रांझ पदक मिळवून दिलं होतं. त्यानंतर वैयक्तिक क्रीडा प्रकारातील दुष्काळ संपवत गतवर्षी पॅरिस इथं झालेल्या ऑलंपिक स्पर्धेत 50 मीटर रायफल थ्री पोजीशनमध्ये कांस्यपदक जिंकून स्वप्नील कुसाळेनं इतिहास रचला होता. अतिशय दुर्गम तालुका अशी ओळख असलेल्या राधानगरी सारख्या ग्रामीण भागात शिक्षण पूर्ण केलेल्या स्वप्नीलनं देशाचं नाव उंचावलं होतं हा अभिमानाचा क्षण होता. तसंच आता अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानं स्वप्नपूर्ती झाल्याचं समाधान असल्याची प्रतिक्रिया वडील सुरेश कुसाळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

सुरेश कुसाळे (ETV Bharat Reporter)

2028 च्या ऑलम्पिकमध्ये साधणार सुवर्णवेध : गत ऑलम्पिक स्पर्धेत नेमबाजीत कास्यपदक मिळवल्यानंतर आता स्वप्नील कुसाळे जोमानं सराव करत असून 2028 मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक जिंकण्यासाठी स्वप्निल आत्तापासूनच सराव करत आहे. मागच्या ऑलिम्पिक स्पर्धेत राहिलेल्या खेळातील उनिवा भरुन काढून पुढच्या ऑलम्पिक स्पर्धेत स्वप्नील कुसाळे सुवर्णपदक जिंकेल असा विश्वासही वडील सुरेश कोसळे यांनी यावेळी व्यक्त केला.

कांबळवाडीत झाला जल्लोष : ग्रामीण भागातून येणाऱ्या स्वप्नील कुसाळीनं देश पातळीवर कोल्हापुरसह देशाचं नाव उंचावलं आहे. केंद्र सरकारकडून कुसाळेला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्याचं जन्मगाव असलेल्या राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावकऱ्यांनी जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आताशीबाजी आणि साखर पेढे वाटून गावच्या सुपुत्राचं अभिनंदन करण्यात आलं.

हेही वाचा :

  1. बॅटिंग करताना सिक्सर मारला अन् कोसळला, फलंदाजाचा क्रिकेट पिचवरच मृत्यू; पाहा व्हिडिओ
  2. रोहित शर्माची सोशल मीडियावर Thank You पोस्ट; चाहत्यांकडून निवृत्ती न घेण्याचं आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.