सिडनी Sam Konstas vs Jasprit Bumrah : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यातील पाचवा कसोटी सामना सिडनी इथं खेळला जात आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे. या सामन्यात बुमराहनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडिया बॅटिंगला आली आणि 185 रन्सवर ऑलआऊट झाली. त्यामुळं सामन्याची शेवटची काही मिनिटं बाकी होती. जेव्हा टीम इंडिया गोलंदाजी करायला आली. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहवर मोठी जबाबदारी आली. बुमराहनं आपली जबाबदारी चोख पार पाडली आणि दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने उस्मान ख्वाजाला बाद केलं. मात्र या दरम्यान त्याची सॅम कॉन्स्टाससोबत बाचाबाची झाली.
Fiery scenes in the final over at the SCG!
— cricket.com.au (@cricketcomau) January 3, 2025
How's that for a finish to Day One 👀#AUSvIND pic.twitter.com/BAAjrFKvnQ
नेमकं काय घडलं : ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या तिसऱ्या षटकात मैदानावर असं काही घडलं ज्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बुमराह ओव्हर्स टाकत होता आणि स्ट्राइकवर असलेला ख्वाजा ॲक्शनमध्ये यायला वेळ घेत होता. या प्रकरणामुळं बुमराह थोडासा चिंतेत दिसत होता. मात्र दुसरीकडं नॉन स्ट्राइकवर असलेल्या सॅम कॉन्स्टासनं अचानक या प्रकरणात उडी घेतली. यानंतर बुमराह रागात सॅमच्या दिशेनं आला. दोघंही एकमेकांना काहीतरी बोलताना दिसले. कॉन्स्टन्सचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसतानाही त्यानं विनाकारण हस्तक्षेप केला आणि बुमराहही नाराज झाला.
बुमराहनं कॉन्स्टससमोर केला जल्लोष : बुमराह आणि कॉन्स्टसला पंचांनी लगेच शांत केलं. यानंतर बुमराहनं ख्वाजाकडे चेंडू टाकला जो डॉट राहिला. पण पुढच्याच चेंडूवर ख्वाजा बाद झाला जो षटकाचा शेवटचा चेंडू होता आणि पहिल्या दिवसाच्या खेळाचाही शेवटचा चेंडू होता. केएल राहुलनं स्लिपमध्ये ख्वाजाचा झेल घेतला. यानंतर बुमराह कॉन्स्टससमोर जोरात जल्लोष करताना दिसला. तसंच इतर भारतीय खेळाडूंनीही कॉन्स्टन्ससमोर जोरात ओरडून विकेटचा आनंद साजरा केला.
How about that drama to end Day 1! 🔥#JaspritBumrah has dismissed #UsmanKhawaja for the 6th time in this series 🐰#AUSvINDOnStar 👉 5th Test, Day 2 | SAT, 4th JAN, 5 AM | #ToughestRivalry #BorderGavaskarTrophy pic.twitter.com/5mEiRv7OBa
— Star Sports (@StarSportsIndia) January 3, 2025
बुमराहनंही फलंदाजीतही केली चांगली खेळी : सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला. ऑस्ट्रेलियानं 3 षटकात ख्वाजाची विकेट गमावत 9 धावा केल्या आहेत. याआधी भारताचा पहिला डाव 185 धावांवर आटोपला होता. भारताकडून ऋषभ पंतनं सर्वाधिक 40 धावा केल्या. रवींद्र जडेजानं 26 धावांचं योगदान दिलं. बुमराहनं गोलंदाजीत एक विकेट घेण्यासोबतच संघासाठी महत्त्वाची खेळीही खेळली. त्यानं 17 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 22 धावा केल्या. रोहितच्या अनुपस्थितीत बुमराह या सामन्यातही कर्णधारपद भूषवत आहे.
हेही वाचा :