लखनौAyodhya Bus Stand : उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाला अयोध्येत नवीन बस स्थानक मिळालंय. या बसस्थानकात मोठी जागा रिकामी आहे. आता अयोध्येत भाविकांची जास्त वर्दळ असल्यानं तसंच त्यांना इथं राहण्यासाठी हॉटेल्स आणि खोल्यांची गरज भासणार आहे. हे लक्षात घेऊभन उत्तर प्रदेश परिवहन महामंडळ आता मोकळ्या जागेवर हॉटेल्स आणि खोल्या बांधण्यार आहे. त्यामुळं बसनं अयोध्येला जाणाऱ्या प्रवाशांना वाजवी दरात सुविधा मिळू शकतील. याचं टेंडर लवकरच मोठ्या कंपनीला देण्यात येणार आहे.
बस स्थानकावर बांधणार 300 हून अधिक खोल्या : पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अयोध्यानगरी आगामी काळात देशातील अनेक मोठ्या शहरांशी स्पर्धा करणार आहे. प्राणप्रतिष्ठापनेनंतर अयोध्येत पर्यटकांची संख्या पूर्वीपेक्षा कितीतरी पटीनं वाढणार आहे. आता अयोध्येचाही पर्यटकांच्या अनुषंगानं विकास केला जातोय. एकीकडं भारतीय रेल्वेनं स्थानकावरच प्रवाशांसाठी कमी भाड्याच्या 300 हून अधिक खोल्या बांधल्या आहेत. तर आता परिवहन महामंडळ देखील प्रवासी आणि भाविकांना बसस्थानकावरच कमी किमतीत हॉटेल आणि रुमची सुविधा देण्याचा विचार करत आहे. अयोध्या धाम बस स्थानक पीपीपी मॉडेलवर विकसित करण्यासाठी परिवहन महामंडळाकडून तयारी करण्यात आलीय. परिवहन महामंडळाच्या अटींनुसार निकषांची पूर्तता करणाऱ्या गटाला लवकरच याची निविदा देण्यात येणार आहे. त्यानंतर बसस्थानकाचा विकास केला जाईल.
सुमारे 33000 चौरस मीटर जागा रिकामी : अयोध्येचं नवीन बसस्थानक बांधूनही सुमारे 33000 चौरस मीटर जागा अद्यापही रिकामी आहे. पीपीपी मॉडेलवर बसस्थानकाचा पुनर्विकास करुन त्याच ठिकाणी हॉटेल आणि खोल्या बांधल्या जातील. जेणेकरून दूरवरुन अयोध्येत येणाऱ्या भाविकांना निवासासाठी इकडे-तिकडे भटकंती करावी लागणार नाही. त्यांना इथं राहण्यासाठी हॉटेलच्या खोल्या वाजवी दरात मिळतील, असं परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आगामी काळात अयोध्या बस स्थानकावरच भाविकांना अनेक सुविधा मिळणार आहेत.
काय म्हणाले परिवहन राज्यमंत्री : उत्तर प्रदेशचे परिवहन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) दयाशंकर सिंग म्हणाले की, "उत्तर प्रदेशातील बस स्थानकांच्या विकासात एक नवीन अध्याय जोडला आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी पीपीपी मॉडेलद्वारे प्रवाशांच्या सुविधा वाढविण्याच्या दिशेनं राज्यानं महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. नुकत्याच झालेल्या निविदा प्रक्रियेत देशाच्या विविध भागांतील विकासकांनी 18 प्रमुख बसस्थानकांपैकी 15 बसस्थानकांसाठी त्यांच्या निविदा सादर केल्या आहेत. अयोध्या धाम, वाराणसी कँट, झिरो रोड, प्रयागराज, कानपूर सेंट्रल (झाकरकट्टी), गोरखपूर, आग्रा ईदगाह, गढमुक्तेश्वर, सोहराबगेट, लखनौ चारबाग, साहिबाबाद, अमौसी, मथुरा, रायबरेली, मिर्झापूर, अलिगढ (रसूल) साठी निविदा प्राप्त झाल्या आहेत. या निविदांचं तांत्रिक मूल्यमापन केल्यानंतर सुमारे 10 दिवसांत आर्थिक निविदा उघडल्या जाणार आहेत."
हेही वाचा :
- प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठाना सोहळ्याचा आजचा सहावा दिवस, 125 कलशानं होणार पूजा