रामनगर :शहरातील प्रसिद्ध दंतचिकित्सक अमित शर्मा यांनी दातांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या ॲक्रेलिक राळापासून रामललाची मूर्ती बनवली आहे. भक्तीमध्ये तल्लीन झालेले डॉ. अमित शर्मा सांगतात की, ते आणखी मूर्ती बनवून लोकांना मोफत वाटणार आहेत.
डॉक्टरांनी बनवली रामांची मूर्ती : प्रभू राम ज्या दिवसापासून अयोध्येत विराजमान झाले, तेव्हापासून संपूर्ण देशात आनंद साजरा केला. प्रभू श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन झालेले लोक देशभरात पाहायला मिळत आहेत. रामनगरचे प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. अमित शर्मा यांचीदेखील प्रभू रामावर नितांत श्रद्धा आहे. त्यांनी दंत उपचारांसाठी प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या ॲक्रेलिक राळापासून थ्रीडी प्रिंटरच्या सहाय्यानं प्रभू श्रीरामांची सुंदर मूर्ती तयार केली आहे.
ॲक्रेलिक राळापासून घडवली मूर्ती :ॲक्रेलिक राळ हा थर्मोप्लास्टिक पदार्थ आहे. हे ऍक्रेलिक ऍसिड, मेथॅक्रिलिक ऍसिडसह इतर संबंधित संयुगापासून मिळतं. ईटीव्ही भारतशी संवाद साधताना दंतचिकित्सक डॉ.अमित शर्मा म्हणाले की, " प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान झाल्यामुळं संपूर्ण देश आनंदात आहे. त्याचप्रमाणे मीही खूप आनंदी आहे. प्रभू श्रीराम आपल्या सर्वात आहेत. त्याच भक्तीभावानं प्रभू श्रीरामांची मूर्ती तयार केली आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी ॲक्रेलिक राळाचा वापर करण्यात आला आहे."
प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं करणार मोफत वाटप : "प्रभू श्रीरामांची मूर्ती बनवण्यासाठी थ्रीडी प्रिंटरचा वापर करण्यात आला आहे. हा प्रिंटर आमच्या लॅब टेक्निशियननं तयार केला आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये तैनात असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रभू श्रीरामांची मूर्ती बनवण्यासाठी सहकार्य केलंय. रामल्लांची मूर्ती ॲक्रेलिक राळपासून बनविली असल्यानं ती अत्यंत हलकी आहे. तसंच त्यामुळं पर्यावरणाचं कोणतीही हानी होत नाही. प्रभू श्रीरामांच्या अधिकाधिक मूर्ती बनवून त्या मोफत रामभक्तांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे," असंही डॉ.अमित शर्मा म्हणाले.
हे वाचंलत का :
- महाराष्ट्रातील रामभक्ताकडून प्रभू श्रीरामांना 80 किलोची विशेष तलवार भेट
- सोलापूरच्या चित्रकाराची अनोखी रामभक्ती; रक्ताने साकारली प्रभू श्री रामांची प्रतिमा
- "तेव्हा बाबांनी प्रभू रामाची मूर्ती ह्रदयाजवळ ठेवली होती"; कारसेवकांची कन्या भावूक