रायपूर BEATING ON WITCHCRAFT: घरातील नागरिक सतत आजारी पडत असल्यानं कुटुंबीयांनी सून आणि मुलाला बेदम मारहाण केली. ही घटना छत्तीसगडमधील कबीरधाम पंडरिया पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या लालपूर खुर्द इथं 15 सप्टेंबरला घडली. या मारहाणीत मुलगा आणि सुनेला जबर मार लागला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पीडिताच्या म्हणण्यानुसार, त्याचे आई-वडील, दोन भाऊ आणि मेहुण्यांनी त्यांच्यावर जादूटोण्याचा आरोप केला. त्यांना काठ्यांनी मारहाण केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. शेजारच्या ग्रामस्थांनी दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र अद्यापही पोलिसांनी कोणती कारवाई केली नाही, असा आरोप पीडित पती-पत्नीनं केला आहे.
सून आणि मुलाला बेदम मारहाण (ETV Bharat) मला जोरदार मारहाण करण्यात आली. यावेळी सासू, सासरे, भावजय, वहिनी आदींनी बेदम मारलं. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. मात्र पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. - पीडित सून
जादू टोण्याच्या आरोपावरुन आई वडिलांनी केली मारहाण :पीडित मुलाच्या पालकांना त्यांची मोठी सून जादूटोणा करत, असा संशय होता. त्यामुळे त्यांना सुनेची आणि मुलाची भीती वाटत होती. त्यांच्या कुटुंबातील काही जण नेहमीच आजारी राहत होते. सून जादू टोणा करत असल्यानेच कुटुंबीयांतील माणसं आजारी राहत असल्याचा संशय त्यांना होता. या कारणावरुन कुटुंबात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. यापूर्वीही दोन वेळा पीडितेनं पंढरीया पोलीस ठाण्यात सासू आणि सासऱ्याविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही तक्रारदारांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हा दाखल करुन वाद सोडवला होता. मात्र हा वाद गेल्या अनेक दिवसांपासून धुमसत होता.
आई-वडिलांनी पत्नीसह मुला बेदम चोपलं : पीडित मुलानं आरोप केला आहे की, 15 सप्टेंबरला सकाळी वडिलांनी आणि आईनं त्याच्या घरी धाव घेतली. यावेळी त्यांनी त्याच्या पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानं मध्यस्थी केल्यावर मोठा भाऊ आणि वहिनीही तिथं आले. यावेळी त्यांनीही काठ्यांनी पत्नीला बेदम मारहाण केली.
पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप :पीडित सुनेनं सासू, सासरा, भावजय आणि मेहुणीवर मारहाणीचा आरोप केला. पीडितेनं सांगितले की, तिला अनेक वेळा मारहाण करण्यात आली. याबाबत त्यांनी पोलिसांकडं तक्रार केली. मात्र ठोस कारवाई झाली नाही. यावेळी पीडितेनं न्यायाची मागणी केली आहे.
पती पत्नीला मारहाण केल्यानं नागरिक संतापले :जादू टोण्याच्या संशयातून पती पत्नीला मारहाण केल्यामुळे नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. त्यामुळे गुरुवारी रात्री मोठ्या संख्येनं पोलीस अधीक्षक कार्यालयात गाठून नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी कोतवाली पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिलं. त्यामुळे नागरिक शांत झाले. पंडरिया पोलीस ठाण्याचे प्रभारी मनीष मिश्रा यांनी सांगितलं की, "पीडित मुलाचा मेहुणा पोलीस ठाण्यात आला होता. यावेळी त्यानं लेखी तक्रार दाखल केली आहे. आरोपी आणि त्याची पत्नी यांनी मिळून त्याच्या आई वडिलांना मारहाण केली. याप्रकरणी सामान्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेचं म्हणणं अद्याप दाखल व्हायचं आहे."
हेही वाचा :
- Mumbai Crime News: सासरच्या मंडळींकडून बलात्कार आणि लैंगिक छळ; भोईवाडा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- गुजरातने जादूटोणा विरोधी कायदा पास करणे स्वागतार्ह, राष्ट्रीय पातळीवरही कायदा करा - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी - Anti Witchcraft Act
- Black Magic In Pune वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या चितेवर तृतीयपंथीयांचा जादूटोणा, पोलिसांनी आवळल्या मुसक्या