ETV Bharat / state

महायुतीच्या विजयानं संजय राऊतांसह प्रियंका चतुर्वेदींपुढे 'हे' असणार संकट, एनडीएची वाढणार ताकद

'विधानसभे'तील पराभवानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार आहे. आमदारसंख्या घटल्यानंतर राज्यसभेत खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांची पुन्हा निवड होणं कठीण होणार आहे.

Mahavikas assembly election 2024 results impact
महाविकास आघाडी राज्यसभा (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2024, 8:29 AM IST

Updated : Nov 25, 2024, 9:05 AM IST

मुंबई: विधानसभेतील आमदारांची संख्या घटल्यानंतर राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे (यूबीटी) नेत्या प्रियंका चतुर्वेदी आणि संजय राऊत यांना यापुढे राज्यसभेत जाण्याची दरवाजे जवळपास बंद होणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील विरोधकांचा शिवसेनेचे (यूबीटी) आणि राष्ट्रवादीचा (एसपी) राज्यसभेत आवाज राहणार नाही. विशेष म्हणजे तीनही नेते हे एनडीएच्या विरोधातील खंबीर आवाज मानले जातात.

विधानसभेतील बलाबलप्रमाणं शिवसेना (उद्धव ठाकरे) 20, तर काँग्रेसकडं 16 आणि राष्ट्रवादीकडं (शरद पवार) 10 जागा आहेत. विधानसभेत महाविकास आघाडीचे एकूण 50 आमदारदेखील नाहीत. बलाबल नसल्यानं खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि खासदार संजय राऊत हे स्वबळावर राज्यसभेत जाऊ शकणार नाहीत.

राऊत, पवार आणि चतुर्वेदी यांचा कार्यकाळ कधी संपणार आहे?

  • राज्यसभेवरील खासदारांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. त्यानुसार राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे (यूबीटी) नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ एप्रिल 2026 रोजी संपणार आहे. तर शिवसेनेचे (यूबीटी) प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांचा जुलै 2028 रोजी कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये शरद पवार यांनी राज्यसभेवर पुन्हा जाणार नसल्याचं यापूर्वीच संकेत दिले आहेत.

काँग्रेसचा एक खासदार निवडून येऊ शकतो-राज्यसभेत 250 सदस्य आहेत. यापैकी 238 खासदार राज्यांच्या विधानसभांद्वारे निवडले जातात. महाराष्ट्राच्या 288 आमदारांच्या विधानसभेसाठी मिळणाऱ्या कोट्यानुसार महाराष्ट्र राज्यसभेवर जास्तीत जास्त 19 सदस्य पाठविता येतात. राज्यसभेची निवडणुकीत एका आमदाराला एकच मतदान केले जाते. राज्यसभा खासदार निवडीच्या फॉर्म्युलानुसार केवळ काँग्रेसचा नेता राज्यसभेत निवडून येऊ शकतो. मात्र, काँग्रेसकडून शिवसेना (यूबीटी) किंवा राष्ट्रवादीचा (एसपी) नेता राज्यसभेत पाठविण्याकरिता मदत होईका? याबाबत सांशकता आहे.

भाजपाची संसदेमधील ताकद वाढणार- 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भाजपाची संसदेमधील ताकद कमी झाली होती. जर शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादीचा (एसपी) नेता राज्यसभेत निवडून आला नाही तर दोन्ही पक्षांची संसदेमधील ताकद आणखी कमी होऊ शकते. यापूर्वीच दोन्ही पक्षांसमोर अस्तित्व टिकविण्याचं आव्हान आहे. कारण, शिवसेनचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीत यश मिळालं आहे. अशा परिस्थितीत एनडीएच्या विधेयकांना विरोध करणाऱ्या आणि सरकारच्या धोरणांवर प्रश्चचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधकांची राज्यसभेतील ताकद आणखी कमी होणार आहे.

महाराष्ट्रातील पक्षनिहाय राज्यसभेत खासदार?सध्या वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत भाजपाचे सात सदस्य आहेत. तर काँग्रेसचे तीन, शिवसेना एक, शिवसेनेचे (यूबीटी) दोन, राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे तीन, राष्ट्रवादीचे (एसपी) दोन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) एक असे राज्यसभेत सदस्य आहेत.

हेही वाचा-

  1. शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड; नारायण राणे म्हणाले...
  2. लाडक्या बहिणींना कधी मिळणार 2100 रुपयांचा हफ्ता ?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली 'ही' महत्वाची माहिती

Last Updated : Nov 25, 2024, 9:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.