नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशन 2024 ला आजपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे संसद भवनात आजपासून सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये खडाजंगी रंगत आहे. अदानी प्रकरणावरुन विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. तर वक्फ बिलावरुन सत्ताधारी विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशन 2024 च्या रणसंग्रामाची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात महायुतीनं मारलेली मुसंडी आणि काँग्रेसचा झालेला दारूण पराभव, याचे पडसादही संसदेत उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान आज विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं राज्यसभा दिवसभर तर लोकसभा बुधवार 27 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
Lok Sabha adjourned till November 27
— ANI Digital (@ani_digital) November 25, 2024
Read @ANI Story | https://t.co/Q5jSpMuGbo#Parliament #wintersession #adjournment pic.twitter.com/gvjxdJwwmi
कथित अदानी लाच प्रकरणावर गोंधळाची शक्यता : संसदेच्या हिवाळी अधिवेशन 2024 च्या रणसंग्रामाला आजपासून सुरुवात होणार आहे. गौतम अदानी यांच्या विदेशातील कथित लाच प्रकरणाच्या आरोपावरुन संसदेत मोठा गोंधळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनी अदानी समूहाच्या कथित लाच प्रकरणावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. गौतम अदानी यांच्या कथित लाच प्रकरणावर जेपीसी नियुक्त करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
#WATCH | Delhi: On LoPs to be invited to speak in the program tomorrow, Congress MP KC Venugopal says, " that is not a demand, that is what we deserved, the entire opposition deserved. when we are talking about the constitution, the constitution clearly projects the role of… pic.twitter.com/Vs1AIRD1ym
— ANI (@ANI) November 25, 2024
जनतेनं नाकारलेले मुठभर लोकं . . . पंतप्रधानांचा हल्लाबोल : आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "जनतेनं नाकारलेले काही लोक गुंडागर्दीच्या माध्यमातून संसदेवर नियंत्रण ठेवण्याचा सतत प्रयत्न करतात. देशातील जनता त्यांच्या सर्व कृत्यांची मोजदाद करुन वेळ आल्यावर त्यांना शिक्षाही देते. मात्र वेदनादायक गोष्ट म्हणजे नवे खासदार नवीन विचार, नवी ऊर्जा घेऊन येतात. ते कोणत्याही एका पक्षाचे नसून सर्व पक्षांचे असतात. त्यांना बोलण्याची संधीही मिळत नाही. दुसरीकडं ज्यांना जनतेनं नाकारलं, त्यांना ना लोकशाहीच्या भावनेचा आदर आहे, ना जनतेच्या आकांक्षांचं महत्त्व आहे. त्यामुळे त्यांना त्यांची जबाबदारी समजू शकत नाहीत. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा कधीच पूर्ण करु शकत नाहीत."
" bjp's biased, hasty attitude responsible for sambhal violence": rahul gandhi accuses party of communal divisions
— ANI Digital (@ani_digital) November 25, 2024
read @ANI Story | https://t.co/7vCppIwMu4#RahulGandhi #Sambhal #Violence #BJP pic.twitter.com/41yB4SucQm
राज्यसभा दिवसभर तर लोकसभा दुपारपर्यंत तहकूब : आज सकाळी राज्यसभेत मोठा गदारोळ झाला. आझाद पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी, "संबळमधील हिंसाचार हा एक मोठा मुद्दा आहे. संबळमध्ये 4 जणांनी आपला प्राण गमवला आहे. हा मुद्दा संसदेत मांडला गेला पाहिजे. हिंसाचार हा कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही, मी कधीच हिंसाचाराचं समर्थन करत नाही. मात्र या घटनेची चौकशी झाली पाहिजे. संबळ हिंसाचार हे पोलीस, प्रशासन आणि सरकारचं अपयश आहे," अशी तोफ त्यांनी डागली. पहिल्यास दिवशी विरोधक आक्रमक झाल्यामुळे लोकसभा बुधवारपर्यंत तर राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.
#WATCH | Delhi: Congress MP KC Venugopal says, " certainly, that (adani issue) is one of the most important issues which parliament has to discuss. govt has to give the time because us govt has taken a case very strongly, the incident happened in india...parliament is the forum… pic.twitter.com/KUOwM11GPf
— ANI (@ANI) November 25, 2024
LIVE: Parliament Winter Session begins today, Waqf to banking law bills to be considered
— ANI Digital (@ani_digital) November 25, 2024
Read @ANI Story | https://t.co/08BptgEuyM#ParliamentWinterSession #Waqflaw #Bankinglaw pic.twitter.com/JTCPNgiC4w
हेही वाचा :