हैदराबाद PINAKA WEAPON SYSTEM : जगातील अनेक देश स्वदेशी मल्टी बॅरल रॉकेट लाँचर (MBRL) मध्ये स्वारस्य दाखवत आहेत. दरम्यान, भारतानं आर्मेनियाला पिनाका रॉकेटचा पुरवठा सुरू केला आहे. संरक्षण सूत्रांनी सांगितलं की, पिनाका मल्टी बॅरल रॉकेट सिस्टमची पहिली तुकडी आर्मेनियाला पाठवण्यात आली आहे. पिनाका रॉकेट लाँचर ही एक अत्यंत सक्षम शस्त्र प्रणाली आहे. यात 80 किलोमीटरहून अधिक अंतरावरच्या लक्ष्यांवर मारा करू शकणाऱ्या प्रकारांचा समावेश आहे.
शस्त्र प्रणालीच्या पुरवठ्यासाठी करार : आर्मेनिया हा भारतीय संरक्षण उपकरणांचा तिसरा सर्वात मोठा खरेदीदार आहे. भारतीय कंपन्या आणि आर्मेनिया यांनी दीर्घ वाटाघाटीनंतर दोन वर्षांपूर्वी या शस्त्र प्रणालीच्या पुरवठ्यासाठी करार केला होता. आर्मेनिया हा भारतातील प्रमुख संरक्षण उपकरण खरेदीदारांपैकी एक आहे. अमेरिका आणि फ्रान्ससह हा देश तिसरा सर्वात मोठा संरक्षण उपकरणे खरेदीदार आहे.
पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी : अलीकडे दक्षिण-पूर्व आशिया आणि युरोपमधील अनेक देशांनी पिनाका रॉकेटमध्ये रस दाखवला आहे. त्याची अनेक नवीन रूपे विकसित करण्यात आली असून भारतीय लष्करही त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश करण्याचा विचार करत आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं (DRDO) देखील अलीकडेच मार्गदर्शित पिनाका रॉकेटची चाचणी घेतली आहे. हे रॉकेट नागपूरस्थित सोलर इंडस्ट्रीज इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेड आणि सरकारी मालकीच्या म्युनिशन इंडिया लिमिटेडनं बनवलं आहे. फ्रान्सनंही ही शस्त्रप्रणाली खरेदी करण्यात स्वारस्य दाखवलं आहे.
निर्यातीला चालना : पिनाका रॉकेट सिस्टीमला हिंदू देवता शिव 'पिनाका' याच्या दैवी धनुष्याचं नाव देण्यात आलं आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी या वर्षी फ्रान्सला उच्चस्तरीय भेट दिली, तेव्हा फ्रान्सनं या प्रणालीमध्ये स्वारस्य दाखवलं होतं. भारत आपल्या स्वदेशी संरक्षण प्रणालींच्या निर्यातीला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेनंतर फ्रान्स हा भारतीय संरक्षण उपकरणांचा दुसरा सर्वात मोठा आयातदार आहे.
हे वाचलंत का :