वायनाडमध्ये प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; राहुल गांधींचाही मोडला रेकॉर्ड - WAYANAD BYPOLL ELECTION RESULTS
केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींनी मोठा विजय मिळवला आहे.
Published : Nov 23, 2024, 10:38 PM IST
तिरुवनंतपुरम : वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत (Wayanad Bypoll Election Results 2024) यूडीएफच्या उमेदवार प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Win) यांनी दणदणीत विजय मिळवलाय. मतमोजणी सुरू होताच त्यांनी स्पष्ट आघाडी घेतली होती. प्रियंका गांधी यांना 6 लाखांहून अधिक मतं मिळाली आहेत. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सत्यन मोकेरी यांचा तब्बल 4 लाखांहून अधिक मतांनी पराभव केलाय.
यूडीएफनं केला होता दावा : या निवडणुकीत प्रियंका गांधी यांनी त्यांचे बंधू राहुल गांधी यांच्या विजयाचा रेकॉर्ड मोडलाय. यापूर्वी यूडीएफनं प्रियंका गांधी यांना विक्रमी बहुमत मिळेल असा दावा केला होता. वायनाड लोकसभा मतदारसंघातील तीन मतदान केंद्रांवर मतमोजणी झाली. कल्पेट्टा, मानंतवाडी आणि बथेरी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी कालपेट्टा एसकेएमजे स्कूलमध्ये झाली. निलांबूर, एरनाड आणि वंदूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी अमल कॉलेज, मैलाडी कौशल्य विकास भवन येथे पार पडली. तर तिरुवांबडी मतदारसंघातील मतांची मोजणी सेंट मेरी एलपी स्कूल, कूडथाई येथे झाली.
राहुल गांधींचाही मोडला रेकॉर्ड : या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. राहुल गांधींनी रायबरेली मतदारसंघ निवडल्याने वायनाड मतदारसंघ रिक्त झाला. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या पोटनिवडणुकीत राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या.
हेही वाचा -