ETV Bharat / sports

तुला 'मुलगी' व्हावंसं का वाटलं? लिंग बदललेल्या अनायाला चाहत्यानं विचारला प्रश्न, सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं कारण - ARYAN TO ANAYA

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षकांचा मुलगा आर्यननं महिला होण्यासाठी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेतली आहे आणि स्वतःचं नाव अनाया ठेवलं आहे.

Aryan to Anaya
Aryan to Anaya (Anaya Bangar Instagram)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 25, 2024, 9:25 AM IST

लंडन Aryan to Anaya : भारतीय संघाचा माजी खेळाडू संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर यानं त्याचं लिंग बदललं आहे. काही दिवसांपूर्वीच आर्यननं त्याच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितलं होतं की त्यानं हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी (HRT) आणि जेंडर ॲफर्मिंग सर्जरी केली आहे आणि आता आर्यन हा अनाया बनला आहे.

अनाया बांगारनं केला खुलासा : या थेरपीनं हळूहळू त्याच्या शरीरात अनेक बदल घडवून आणले. यामुळं त्याचे स्नायू आणि ताकद लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन थेरपी दरम्यान होणारे बदल आणि संघर्ष देखील स्पष्ट केले गेले. ही बाब लोकांच्या लक्षात आल्यापासून संजय बांगर यांचा मुलगा चर्चेत आला आहे आणि सोशल मीडियावरील लोकांना त्यानं लिंग बदलाचा निर्णय का घेतला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. दरम्यान, खुद्द अनाया बांगरनं याचा खुलासा केला आहे.

Aryan to Anaya
अनाया बांगर स्टोरी (Anaya Bangar Instagram)

संजय बांगरच्या मुलानं मुलगी होण्याचं सांगितलं कारण : अनाया बांगरनं तिच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर ही कथा शेअर केली, ज्यात तिनं तिच्या चाहत्यांना प्रश्न विचारण्यास सांगितलं. या कारणास्तव चाहत्यांना तिला खुलेपणानं प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य मिळालं, ज्याला अनाया बांगरनं खूप चांगलं उत्तर दिलं. एका चाहत्यानं प्रश्न विचारला, तू मुलगी का झालीस? ज्याला अनायानं उत्तर दिलं की, "लहानपणापासून मला वाटत होते की मी मुलगी असावी." अनाया बांगरला चाहत्यांनी आणखी अनेक प्रश्न विचारले.

सोशल मीडियावर असते सक्रीय : अनाया बांगर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचा परिवर्तनाचा प्रवासही ती शेअर करत असते. काही काळापूर्वी, तिनं तिच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर एक रील शेअर केला होता आणि सांगितलं होतं की, गेल्या 11 महिन्यांपासून सुरु असलेल्या हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन थेरपीमध्ये अनेक बदल होत आहेत. ताकद कमी होत आहे पण आनंद वाढत आहे. शरीरातही अनेक बदल होत असतात. चिंता कमी होत आहे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे, पण प्रत्येक पाऊल मला स्वतःच्या जवळ आणत आहे. हार्मोनल थेरपी दरम्यान होणारे शारीरिक बदल, आनंद आणि अस्वस्थता अशा अनेक समस्या तिनं सांगितल्या. दरम्यान, अनायानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिनं तिच्या मनातील भावनांबद्दल खोलवर लिहिलं आहे.

अनाया बांगरनं काय केली पोस्ट : अनाया बांगरनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंट इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याद्वारे तिनं तिच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत आणि ती म्हणते, "माझा परिवर्तनाचा प्रवास दुर्दैवानं अत्यंत वैयक्तिक आहे. यामुळं माझ्या वडिलांवर अनावश्यक आणि अन्यायकारक टीका झाली आहे. मला स्पष्टपणे सांगायचं आहे, हा माझा निर्णय होता, माझं सत्य आणि आनंदाचा माझा मार्ग होता, माझे वडील नेहमीच प्रेम आणि समर्थनाचे आधारस्तंभ आहेत आणि माझ्या निवडीसाठी त्यांना लक्ष्य करणं केवळ अन्यायकारक नाही तर अत्यंत दुखावलं आहे. चला द्वेषापेक्षा दयाळूपणा, द्वेषापेक्षा सहानुभूती निवडू या आणि प्रत्येकाला त्यांचं सत्य जगणं सुरक्षित वाटेल असं जग निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करुया." अनया बांगर जेव्हा जेव्हा सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर करते तेव्हा चाहते तिला नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात. ज्याला तिनं या पोस्टद्वारे उत्तर दिलं आहे.

हेही वाचा :

  1. आर्यन ते अनाया... दिग्गज भारतीय क्रिकेटपटूच्या मुलानं बदललं लिंग, स्वतः शेअर केले फोटो
  2. 'आर्यन'चं 'अनाया' होण्याआधी 'या' दिग्गज क्रिकेटपटूनं बदललं होतं लिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.