महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बंगालच्या उपसागरात खनिजं शोधताना उलगडलं 29 जणांच्या बेपत्ता होण्याचं रहस्य, वाचा ETV Bharat Exclusive स्टोरी - ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेईकल

IAF An 32 Mystery : 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी' च्या मानवरहित वाहनानं खनिजं शोधण्यासाठी बंगालच्या उपसागरात डुबकी मारली होती, परंतु त्याऐवजी त्याला 2016 मध्ये 29 जणांसह बेपत्ता झालेल्या IAF विमानाचे अवशेष सापडले. NIOT नं हे नवीन तंत्रज्ञान काय आहे आणि हे अभियान कसं पार पाडलं गेलं? वाचा 'ईटीव्ही भारत'चे रिपोर्टर रविचंद्रन यांचा हा अत्यंत खास रिपोर्ट..

NIOT AUV
NIOT AUV

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 23, 2024, 9:12 AM IST

पाहा व्हिडिओ

चेन्नई IAF An 32 Mystery : बंगालच्या उपसागरात खोलवर खनिजं शोधण्याचा उद्देश असलेल्या चेन्नईस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT) च्या मोहिमेनं एक सागरी गूढ उकललं गेलं. NIOT च्या ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेईकल (AUV) ला या महिन्याच्या सुरुवातीला, सात वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या IAF An-32 चे अवशेष सापडले.

विमान बंगालच्या उपसागरात गायब झालं : 22 जुलै 2016 ला अपघात झालेल्या अँटोनोव्ह An-32 मध्ये 29 संरक्षण कर्मचारी होते. हे बंगालच्या उपसागरात गूढपणे गायब झालं. 'ऑप मिशन'वरील विमानानं चेन्नईच्या तांबरम एअर फोर्स स्टेशनवरून सकाळी 8.30 च्या सुमारास उड्डाण केलं होतं. ते अंदमान निकोबार बेटावरील पोर्ट ब्लेअर येथे सकाळी 11.45 वाजता पोहोचणार होतं. मात्र चेन्नईपासून अंदाजे 280 किलोमीटर अंतरावर असताना सकाळी 9.15 च्या सुमारास IAF अधिकाऱ्यांचा विमानाशी संपर्क तुटला.

विमानातील सर्व लोक मृत मानले गेले : विमानातील 29 संरक्षण कर्मचार्‍यांमध्ये सहा क्रू सदस्य, 11 भारतीय हवाई दलाचे कर्मचारी, दोन सैनिक आणि नौदल शस्त्रागार डेपोशी संलग्न आठ कर्मचारी होते. यानंतर, बेपत्ता An-32 शोधण्यासाठी अनेक जहाजं, पाणबुड्या आणि विमानांना घेऊन पुढील सहा आठवड्यांपर्यंत मोठी शोध मोहीम राबवण्यात आली. 16 सप्टेंबर 2016 रोजी अधिकाऱ्यांनी शोध आणि बचाव मोहीम बंद केली. विमानातील 29 लोक मृत मानले गेले आणि त्यांच्या कुटुंबीयांना तसं सूचित करण्यात आलं.

साडेसात वर्षांनंतर अवशेष सापडले : सात वर्ष आणि सहा महिन्यांनंतर, एनआयओटीच्या एयूव्हीला चेन्नई किनारपट्टीपासून 310 किमी अंतरावर असलेल्या An-32 विमानाचे अवशेष सापडले. संरक्षण मंत्रालयानं सांगितलं की, AUV नं टिपलेल्या प्रतिमांची छाननी केली असता ते दुर्दैवी विमानाचे होते. एनआयओटीचे शास्त्रज्ञ डॉ एन आर रमेश यांच्या मते, संस्थेकडे सजीव आणि निर्जीव संसाधनांच्या शोध आणि शोषणासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याचे आदेश आहेत.

अंडरवॉटर वाहन विकसित केलं : "समुद्राखाली उपलब्ध खनिजांच्या शोधासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी NIOT ने एक स्वायत्त अंडरवॉटर वाहन विकसित केलं आहे. हे वाहन 6,000 मीटर खोलीपर्यंत जाण्यास सक्षम आहे," असं रमेश यांनी सांगितलं. हे AUV 6.6 मीटर लांब आणि 0.875 मीटर व्यासाचं असून याचं वजन 2.1 टन आहे.

वाहन नॉर्वेहून आणलं : नॉर्वेहून आणलेलं हे वाहन बंगालच्या उपसागरात नियमित काम करत असताना आयताकृती आकारातील काही "मानवनिर्मित वस्तू" वर अडखळलं. "यूएव्हीनं बंगालच्या उपसागरात 3,400 मीटर खोल काही वस्तूंचं प्रतिबिंब टिपलं. सोनारच्या प्रतिमांचे विश्लेषण केल्यावर, आम्हाला कळलं की ते धातूच्या वस्तू आहेत जे 2016 मध्ये हरवलेले विमानाचे भाग असू शकतात," असं डॉ. रमेश म्हणाले.

भारतीय हवाई दलाची पुष्टी : एनआयओटीनं याबाबत आणखी शोध घेण्याचं ठरवलं. एनआयओटीच्या शास्त्रज्ञानं सांगितलं की, "आम्ही वस्तूंची फोटो घेण्यासाठी समुद्रतळाच्या जवळ गेलो होतो." NIOT नं निष्कर्षांची पुष्टी करण्यासाठी संरक्षण मंत्रालय (MoD) आणि भारतीय हवाई दलाला फोटो पाठवले. "त्यांनी (MOD) पुष्टी केली की ते An-32 चे भाग होते, जे 2016, 22 जुलै रोजी हरवलं होतं," असं रमेश यांनी सांगितलं.

संरक्षण मंत्र्यांचं निवेदन : 12 जानेवारी 2024 रोजी संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनानुसार, मल्टी-बीम सोनार (साउंड नेव्हिगेशन आणि रेंजिंग), सिंथेटिक ऍपर्चर सोनार आणि उच्च-बीमसह अनेक पेलोड वापरून 3400 मीटर खोलीवर शोध घेण्यात आला. "या फोटोंची छाननी करण्यात आली आणि ती An-32 विमानाशी सुसंगत असल्याचं आढळलं. या अपघातस्थळी इतर कोणत्याही बेपत्ता विमानाचा रेकॉर्ड नव्हता. त्यामुळे हा ढिगारा कदाचित क्रॅश झालेल्या IAF An-32 (K-2743) चा असावा," असं संरक्षण मंत्र्यांनी निवेदनात म्हटलं.

3,400 मीटर खोल जाऊन सर्वेक्षण : डीप सी टेक्नॉलॉजी ग्रुपचे आणखी एक एनआयओटी वैज्ञानिक प्रभारी, एस रमेश म्हणाले की, एयूव्हीच्या उच्च-रिझोल्यूशन मॅपिंग क्षमतेमुळे, ते अवशेष शोधण्यात सक्षम होते. "आम्ही उच्च-रिझोल्यूशन मॅपिंग पेलोड असलेल्या AUV मुळे 3,400 मीटरपर्यंत खाली जाऊन सर्वेक्षण करू शकलो आणि काही मानवनिर्मित वस्तू उचलू शकलो. हे An-32 चे अवशेष असू शकतात", असं एस रमेश म्हणाले.

AUV चं चोख कार्य : AUV नं आपले नेमून दिलेले कार्य यशस्वीरित्या पार पाडले आणि मध्य हिंद महासागरातील पॉलिमेटॅलिक नोड्यूल खाण क्षेत्र कव्हर केलं. "आम्ही उपलब्ध गाठींचा शोध घेतला आहे. उपलब्ध खनिजं म्हणजे मॅंगनीज, तांबे, निकेल आणि कोबाल्ट आहेत," असं एनआर रमेश म्हणाले.

आणखी एक वाहन विकसित करणार : एनआयओटीचे संचालक ए रामदास म्हणाले की, संस्था एक स्वायत्त संस्था आहे आणि सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही सागरी संसाधनांचा शोध आणि काढणीसाठी तंत्रज्ञान विकसित करण्यात गुंतलेली आहे. निर्जीव संसाधनांच्या शोधाचा एक भाग म्हणून, आम्ही 5,000 मीटर पाण्याच्या खोलीपर्यंत जाऊ शकणारे तंत्रज्ञान विकसित करत आहोत. आतापर्यंत, एनआयओटीनं मानवरहित जहाजांवरून चालणारी वाहनं विकसित केली आहेत. आता, NIOT एक असे वाहन विकसित करत आहे जे 3 लोकांना 6 किमी पर्यंत समुद्राच्या खोलीपर्यंत नेऊ शकते.

हे वाचलंत का :

  1. 'DeepFake' म्हणजे नेमकं काय रे भाऊ? 'तो' व्हिडिओ ओळखायचा कसा? जाणून घ्या सर्वकाही

ABOUT THE AUTHOR

...view details