नीट 2024 पेपर लीक प्रकरणी एनटीएनं पुन्हा दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, "यंदा सरासरी गुणांमध्ये 45 टक्क्यांनी वाढ" - Nta On Neet Ug - NTA ON NEET UG
NTA Clarification On NEET Result : नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं NEET UG या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलय. एनटीएच्या वरिष्ठ संचालक डॉ. साधना पराशर यांनी स्पष्टपणे सांगितलंय की, अन्यायकारक मिन्स प्रकरणी नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं केलेल्या नियमांनुसार कारवाई केली जात आहे.
नीट पेपर लिक प्रकरणी एनटीएचं स्पष्टीकरण (Source ETV Bharat)
कोटा NTA Clarification On NEET Result : नॅशनल टेस्टिंग एजन्सी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG च्या बाबतीत पेपर लीक आणि हेराफेरीच्या आरोपांना सतत उत्तर देत असल्याचं पाहायला मिळतंय. याप्रकरणी नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोपही परीक्षार्थी करत आहेत. तसंच सोशल मीडियावरून देखील नॅशनल टेस्टिंग एजन्सीला सातत्यानं टार्गेट केलं जातंय. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं आज पुन्हा या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय. या संदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये एनटीएच्या वरिष्ठ संचालक डॉ. साधना पराशर यांनी स्पष्ट शब्दात म्हटलंय की, अनुचित मिन्स प्रकरणी नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं बनवलेल्या नियमांनुसार कारवाई केली जात आहे.
दुसरीकडं, नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं उमेदवारांच्या जागी परीक्षेला बसलेल्या काही लोकांना पकडलं होतं. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. एनटीए देखील NEET UG प्रकरणाचा तपास करणाऱ्या एजन्सीला पूर्ण मदत करत आहे. परंतु त्यांनी हे स्पष्ट केलंय की राज्य पोलिसांनी नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये अद्याप संपूर्ण संशोधन केलं गेलं नाही. तसंच आजपर्यंत पेपरफुटीचं एकही प्रकरण समोर आलेलं नाही. त्यामुळंच पेपर फुटला नसल्याचं स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलंय.
45 गुणांची वाढ : यासंदर्भात अधिक माहिती देत शिक्षण तज्ञ देव शर्मा म्हणाले, राष्ट्रीय चाचणी एजन्सीनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी NEET UG मध्ये बसलेल्या उमेदवारांचे सरासरी गुण 279.41 होते. तर यावेळी हे गुण वाढून 323.55 झाले आहेत. अशा स्थितीत सुमारे 45 अंकांची वाढ दिसून आलीय. त्यामुळं नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं जारी केलेल्या कट ऑफमध्येही वाढ झाली आहे. गेल्यावर्षी गुणसंख्या 137 गुण होती. तर यावेळी ती 164 गुणांवर पोहोचली आहे.
...त्यामुळं गुण वाढले पाहिजेत : डॉ. साधना पराशर यांनी यावेळी भौतिकशास्त्राच्या प्रश्नाचा दाखला दिला. त्या म्हणाल्या की, या प्रश्नावर उमेदवारांनी 13,373 आव्हानं दिली होती. यामध्ये जुनी एनसीआरटी आणि नवीन एनसीआरटी अंतर्गत वेगवेगळी उत्तरं येत होती. अशा स्थितीत यापूर्वी तात्पुरत्या उत्तरपत्रिकेतील एक उत्तर बरोबर मानलं जात होतं. त्यामुळं 17 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळत होते, परंतु विद्यार्थ्यांच्या आक्षेपावर दोन पर्यायही बरोबर मानले गेले. तेव्हा विद्यार्थ्यांची संख्या 44 नं वाढली. तर, ग्रेस गुण मिळाल्यानंतर, 6 उमेदवार टॉप लिस्टमध्ये पोहोचले आणि त्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले.
न्यायालयाच्या आदेशावर ग्रेसिंग गुण : नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं हे देखील उघड केलंय की, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि छत्तीसगडच्या उच्च न्यायालयात एक रिट याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये उमेदवारांनी NEET UG परीक्षेच्या काही केंद्रांवर वेळ गमावल्याबद्दल सांगितलं होतं. सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांची तपासणी केली असता ही बाब खरी असल्याचं दिसून आलं. त्यानंतरच न्यायालयाच्या आदेशानुसार 1563 उमेदवारांना ग्रेस मार्क्स देण्यात आले.