हैदराबाद : रामोजी ग्रुपचे अध्यक्ष दिवंगत रामोजी राव यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त 'मार्गदर्शी चिट फंड'च्या तीन नवीन शाखांचं उद्घाटन करण्यात आलं. 'मार्गदर्शी चिट फंड'च्या व्यवस्थापकीय संचालक शैलजा किरण यांनी ऑनलाइन पद्धतीनं तिन्ही शाखांचं उद्घाटन केलं. वानापर्थी, शमशाबाद आणि हस्तिनापुरम येथे स्थापन झालेल्या शाखांचं शैलजा किरण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आंध्र प्रदेश, तेलंगाणा, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये सहा दशकांहून अधिक काळ सेवा देत असलेल्या 'मार्गदर्शी चिट फंड'नं चार राज्यांमध्ये 118 शाखांचा विस्तार केला आहे.
'मार्गदर्शी'च्या तीन नवीन शाखा :शैलजा किरण यांच्याकडून आज सकाळी वानापर्थी येथील 116 व्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. तर दुपारच्या सुमारास शमशाबाद मंडळ रंगारेड्डी जिल्ह्यातील रल्लागुडा येथील 117 व्या आणि हस्तिनापुरम येथील 118 व्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. उपाध्यक्ष राजाजी यांच्यासह सीईओ सत्यनारायण आणि शाखा व्यवस्थापक अरुण कुमार यांनी दीपप्रज्वलन केलं. संचालक व्यंकटस्वामी उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले होते.