महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणुकीची लगबग, कर्नाटकमध्ये शाईच्या उत्पादनाला वेग - Mylac in karnatak

लोकसभा निवडणूक आता अगदी जवळ आली आहे. हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाकडून जोरात तयारी सुरू आहे. म्हैसूर, कर्नाटक येथे मायलॅक कंपनीद्वारे 26.55 लाख शाईच्या बाटल्यांचं उत्पादन केलं जात आहे.

अधिकारी
अधिकारी

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 7:29 PM IST

म्हैसूर, (कर्नाटक) : कर्नाटकमध्ये मायलॅक कंपनीद्वारे 26.55 लाख शाईच्या बाटल्यांचं उत्पादन केलं जात आहे. इंक कंपनीत सध्या हे शाई बाटल्यांच्या उत्पादनाचं जोरात काम सुरू आहे. मतदान केल्यानंतर मतदाराच्या हातावर लावण्यात येणारी शाई तयार करण्याचं हे काम आहे. हे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने कंपनीला दिले आहेत.

10 मिली बाटली 700 मतदारांसाठी : लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळं मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या व्यक्तीनं मतदान केल्याची खूण म्हणून ही शाई त्याच्या बोटावर लावली जाते. तर ही शाई म्हैसूर पेंट आणि वार्निश लिमिटेडद्वारे पुरवली जाते. 15 मार्चपर्यंत सर्व राज्यांना 10 मिली अमिट शाई पुरवण्याची व्यवस्था केली जात आहे. तसंच, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा या राज्यांना अंतिम टप्प्यात ती पुरवली जाईल. याबाबत बोलताना, कंपनीचे संचालक मोहम्मद इरफान म्हणाले की, "10 मिली बाटली ही 700 मतदारांच्या बोटांना शाई लावण्यासाठी पुरेशी आहे."

मायलॅकचा इतिहास: मायलॅक हा कर्नाटक सरकारच्या अखत्यारीतील उपक्रम आहे. या कंपनीला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1937 मध्ये नलवाडी कृष्णराजा वोडेयर यांनी म्हैसूरमध्ये स्थापन केला होता. त्यानंतर 1947 मध्ये, मायलॅक कंपनी कर्नाटक सरकारनं ताब्यात घेतली. कंपनीच नाव बदलून म्हैसूर पेंट लिमिटेड करण्यात आलं.

संपूर्ण देशात शाई पाठवतो :कंपनीचे संचालक इरफान म्हणाले, "शाईच्या पुरवठ्यासाठी आम्हाला २८ मार्चची मुदत देण्यात आली आहे. मार्चपर्यंत त्यांचे वितरण करावे, असे निवडणूक आयोगानं सांगितलं. आम्हीही शक्य तितक्या लवकर वितरित करण्याचा प्रयत्न करत आहोत. हा उद्योग 75 वर्षांपासून चांगली कामगिरी करत आहे. निवडणूक आयोगानं येऊन पाहणी केली आहे. येथे त्यांनी गुणवत्तेची चाचणी केली आहे असही ते म्हणालेत.

ABOUT THE AUTHOR

...view details