नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणूकची रणधुमाळी सुरू झाली आहे. आगामी दिल्ली निवडणूक 2025 ची तारीख जाहीर करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज पत्रकार परिषद घेतली. दिल्लीतील विधानसभा कार्यकाळ 23 फेब्रुवारीला संपत आहे. नवीन सरकार स्थापन करण्यासाठी त्यापूर्वी निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. दिल्लीत एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका (Delhi Election 2025) होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.
5 फेब्रुवारी रोजी होणार मतदान : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (7 जानेवारी) दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राजधानी नवी दिल्लीचा पुढील पाच वर्ष कारभार कोणाच्या हाती असणार याचा फैसला 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. यासह दिल्लीत आचारसहिंता लागू झाली आहे. दिल्ली विधानसभेची मुदत 23 फेब्रुवारी रोजी संपणार आहे.
#DelhiElections2025 | Chief Election Commissioner Rajiv Kumar says, " the union budget will come on february 1 and delhi will vote on february 5. today itself, we will issue a standing instruction to the cabinet secretary that there should be no announcement related to delhi in… pic.twitter.com/FlfxNcnCDa
— ANI (@ANI) January 7, 2025
ईव्हीएमच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं उत्तर : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्यानं ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. यावर देखील आज निवडणूक आयोगानं आपली भूमिका स्पष्ट केली. ईव्हीएम हॅक करता येत नाही असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. तसेच सायंकाळी सहानंतर अचानक मतदान वाढलं कसं असा प्रश्नही महाविकास आघाडीकडून उपस्थित करण्यात येत होता. या प्रश्नाला देखील या पत्रकार परिषदेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी उत्तर दिलंय. सायंकाळी साडेसहाला जो आकडा जाहीर करण्यात येतो, त्यामध्ये मतदानाची पूर्ण टक्केवारी सांगता येणं अवघड असतं, मात्र फायनल टक्केवारी ही रात्री आकराच्या सुमारास येते असं त्यांनी स्पष्ट केलं.
#WATCH | #DelhiElections2025 | Chief Election Commissioner Rajiv Kumar says, " ...people also go to the level of threatening the polling officers but we restrain ourselves because it disturbs the level playing field. it is the duty of star campaigners and those who are involved in… pic.twitter.com/s5wz3lFQDZ
— ANI (@ANI) January 7, 2025
हेही वाचा -