नवी दिल्ली Lok Sabha Elections :आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगानं शुक्रवारी अधिसूचना जारी केलीय. या अधिसूचनेनुसार, 19 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 1 जून रोजी संध्याकाळी 6.30 या वेळेत एक्झिट पोल आयोजित करणे, प्रकाशित करणे किंवा प्रचार करणे यावर बंदी (Exit Polls Ban) घालण्यात आलीय. याबरोबरच इतरही अनेक निर्बंध निवडणूक आयोगानं घालून दिले आहेत.
एक्झिट पोलवर बंदी : निवडणूक आयोगानं एक अधिसूचना जारी केलीय, ज्यामध्ये 19 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 1 जून रोजी संध्याकाळी 6:30 दरम्यान एक्झिट पोल आयोजित करणे, प्रकाशित करणे किंवा प्रसिद्ध करणे यावर बंदी घालण्यात आलीय. याच काळात लोकसभेशिवाय चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी वेगवेगळ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळं या पोलचा परिणाम इतर निवडणुकांवर पडू नये यासाठी खबरदारी म्हणून निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय.