चंदीगड : विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी शंभू सीमा आणि खनौरी सीमेवर आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनात आता आंदोलक शेतकऱ्यांनी रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलक आज दुपारी 12 ते 3 वाजतापर्यंत तब्बल 48 ठिकाणी रुळावर बसून आंदोलन करणार आहेत. त्यामुळे रेल्वे सेवेला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमृतसर, जालंधर आणि होशियारपूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शेतकरी ट्रॅकवर बसून आंदोलन करणार आहेत. 14 डिसेंबरला शेतकरी नेते सर्वन पंढेर यांनी रेल रोको आंदोलनाची घोषणा केली.
या ठिकाणी शेतकरी करणार आहे आंदोलन : जितवाल, डगरू, मोगा स्टेशन, फरीदकोट स्टेशन, कादियान, फतेहगढ चुरियन, बटाला प्लॅटफॉर्म, गुरुदासपूर, लोहिया खास, फिल्लौर, जालंधर कँट, ढिलवान, परमानंद प्लॅटफॉर्म, तांडा, दसुहा, होशियारपूर, मडियाला आणि माहिलपूर, मखू, मल्लनवाला, तलवंडी भाई, बस्ती टंकनवली, जगराव, साहनेवाल, शंभू स्टेशन, मोहाली रेल्वे स्टेशन, संगरूर जिल्ह्यातील सुनम, अहमदगड, बरेटा, रूप नगर, देविदासपुरा, बियास, पंधेर कलान, कठू नांगल रामदास, जहांगीर, झंडे, फाजिल्का रेल्वे स्थानक, पट्टी, खेमकरण, तरण तारण, बहराम, रामपुरा, हमीरा, सुलतानपूर, लोधी आणि फगवाडा, मलोत आदी ठिकाणी शेतकरी आंदोलन करणार आहेत.
किसान मोर्चानं बोलावली बैठक : खनौरी सीमेवर शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांच्या आमरण उपोषणाबाबत संयुक्त किसान मोर्चानं (SKM) आज तातडीची बैठक बोलावली. चंदीगड येथील किसान भवन इथं दुपारी 2 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत जगजित सिंग डल्लेवाल यांच्या संघर्षाला पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानंतर सायंकाळी 7 वाजता राज्यपालांची भेट घेण्यात येणार आहे. यापूर्वी ही बैठक 24 डिसेंबरला होणार होती. मात्र शेतकरी नेते जगजित डल्लेवाल यांची प्रकृती ढासळल्यानं बैठकीची वेळ बदलण्यात आली.
उच्चाधिकार समितीच्या बैठकीला जाण्यास नकार : उच्चाधिकार समितीनं आजच शेतकऱ्यांना पंचकुलामध्ये बैठकीसाठी बोलावलं. मात्र शेतकऱ्यांनी समितीला पत्र लिहून बैठकीला येण्यास स्पष्ट नकार दिला. केंद्र सरकारशीच चर्चा करणार असल्याचं शेतकरी संघटनांचं मत आहे. शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांच्या उपोषणाचा आज 23 वा दिवस आहे. मंगळवारी प्रकृती खालावल्यानं ते खोलीतून बाहेर पडले नाहीत. "डल्लेवाल यांचं यकृत आणि किडनीवर आंदोलनामुळे परिणाम होत आहे. त्यांच्या दृष्टीतही फरक पडत आहे. त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडालेला असून ते काहीही खात नाहीत," असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
हेही वाचा :