मुंबई Champions Trophy Press Conference Live : बहुप्रतिक्षित ICC चॅम्पियन्स ट्रॉफी येत्या 19 फेब्रुवारीपासून सुरु होईल. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 दरम्यान खेळवली जाईल. ही स्पर्धा पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) संयुक्तपणे आयोजित करतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) अद्याप यासाठी टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. आता बीसीसीआय टीम इंडियाची घोषणा करण्यास पूर्णपणे तयार आहे. आज 18 जानेवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाईल.
India's Champions Trophy squad announcement to be made tomorrow, 18th January by Captain Rohit Sharma and Men's Selection Committee Chairman Ajit Agarkar, in Mumbai.
— ANI (@ANI) January 17, 2025
भारताचे सामने दुबईत होणार : BCCI निवड समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार आहे. ही परिषद साधारण दुपारी 12:30 वाजता आयोजित केली जाईल. या परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर दिसतील. भारतीय क्रिकेट संघाचे सर्व सामने यूएईमधील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळले जातील. जर भारतीय संघ उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर हे सामने देखील दुबईमध्येही होतील. तथापि, जर भारत या सामन्यांसाठी पात्र ठरला नाही, तर हे सामने पाकिस्तानमधील लाहोर इथं होतील.
Captain Rohit Sharma and Ajit Agarkar will address the PC tomorrow at 12.30pm.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 17, 2025
- It'll be live on Star Sports and Hotstar. pic.twitter.com/fKmf0cdCUH
फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवली जाईल चॅम्पियन्स ट्रॉफी : ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे, तर स्पर्धेचा अंतिम सामना 9 मार्च रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी, 8 संघांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे, ज्यामध्ये गट-अ आणि गट-ब यांचा समावेश आहे. टीम इंडियाला पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडसह ग्रुप अ मध्ये स्थान देण्यात आलं आहे. टीम इंडिया 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाची कामगिरी : ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आतापर्यंत एकूण आठ आवृत्त्या खेळल्या गेल्या आहेत. या काळात, ऑस्ट्रेलियाने 2006 आणि 2009 मध्ये ट्रॉफी जिंकली. टीम इंडिया दोनदा चॅम्पियन बनली आहे, पण दोन्ही वेळा ती पूर्ण चॅम्पियन बनू शकली नाही. 2013 मध्ये टीम इंडिया विजेती होती पण 2002 मध्ये त्यांना श्रीलंकेसोबत विजेतेपद सामायिक करावं लागले. तर पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांनी प्रत्येकी एकदा विजेतेपद जिंकलं आहे.
🚨 CHAMPIONS TROPHY TEAM. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 17, 2025
- India's CT squad will be picked tomorrow. (Gaurav Gupta/TOI). pic.twitter.com/tj4qyFOMAr
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी BCCI निवड समितीची पत्रकार परिषद कुठं आणि कशी पाहायची?
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी BCCI निवड समितीची पत्रकार परिषद टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि स्पोर्ट्स 18 या चॅनल्सवर लाईव्ह पाहता येईल. तसंच या पत्रकार परिषदेची लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा आणि हॉटस्टारवर पाहता येईल.
हेही वाचा :