ETV Bharat / bharat

रामोजी फिल्म सिटीत 'हिवाळी महोत्सवा'चं आयोजन, पर्यटकांसाठी खास पॅकेजेस, 19 डिसेंबरपासून सुरूवात - RAMOJI FILM CITY WINTER FEST

हैदराबादमधील जगप्रसिद्ध अशा 'रामोजी फिल्म सिटी'मध्ये 19 डिसेंबर ते 19 जानेवारी या कालावधीत विशेष अशा 'हिवाळी महोत्सवा'चं आयोजन करण्यात आलं आहे.

RAMOJI FILM CITY Winter Fest
रामोजी फिल्म सिटी हिवाळी महोत्सव (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 18, 2024, 7:53 PM IST

Updated : Dec 19, 2024, 7:20 AM IST

हैदराबाद : जगप्रसिद्ध 'रामोजी फिल्म सिटी'मध्ये (Ramoji Film City ) 19 डिसेंबर ते 19 जानेवारी या कालावधीत 'हिवाळी महोत्सवा'चं ( Winter Fest Celebration ) आयोजन करण्यात आलं आहे. या कालावधीत अनेक विशेष कार्यक्रमांच्याबरोबरच चमचमणाऱ्या बागेचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. यात कार्निव्हल परेड, आंतरराष्ट्रीय मनोरंजनादरम्यान लाइव्ह डीजेचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. पर्यटकांना संध्याकाळचा आनंद लुटता यावा यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलीय.

या वेळेत कार्यक्रमांचा आनंद घेता येणार : ज्यांना 'हिवाळी महोत्सवा'चा आनंद घ्यायचा आहे, त्यांना एक दिवसाचा दौरा, संध्याकाळ आणि इतर पॅकेजेसमध्ये सहभागी होता येणार आहे. रामोजी फिल्म सिटीत ज्यांना हिवाळी उत्सवाचा पुरेपूर आनंद लुटायचा आहे, त्यांच्यासाठी विविध आकर्षक हॉलिडे पॅकेजेस उपलब्ध आहेत. पर्यटक सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत फिल्मसिटीला भेट देण्याचा आणि खास मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतात.

रामोजी फिल्म सिटीत 'हिवाळी महोत्सवा'चं आयोजन (Source- ETV Bharat)

विशेष पॅकेजेस उपलब्ध : 19 जानेवारीपर्यंत सुरू राहणार्‍या रामोजी विंटर फेस्ट सोहळ्यात तुम्हीही सहभागी होऊन अविस्मरणीय आठवणींचा खजिना तयार करू शकता. उत्सवादरम्यान, ज्यांना फिल्मसिटीत हॉटेल्समध्ये राहून या उत्सवाचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी येथील हॉटेलमध्ये विशेष पॅकेजेस उपलब्ध आहेत.

Ramoji Film City
संपूर्ण कुटुंबासाठी पर्यटनाचा पुरेपूर आनंद (Source- ETV Bharat)

पर्यटकांसाठी हे असणार खास आकर्षण

  • म्युझिकल ग्लो गार्डन- रामोजी फिल्मसिटीच्या हिवाळी महोत्सवादरम्यान म्युझिकल ग्लो गार्डनला भेट म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. यावेळी पर्यटकांना वेगवेगळ्या रंगातील प्रकाश, ध्वनी आणि निसर्गाच्या अभूतपूर्ण वातावरणात स्वप्नवत वाटावी अशी बाग दिसणार आहे. यात मधुर आवाज आणि ऑडिओ इफेक्ट्सची भर पडणार आहे.
Ramoji Film City Winter Fest Celebration
रामोजीची स्वप्नवत सफर (Source- ETV Bharat)
  • मोशन कॅप्चर आणि व्हर्च्युअल शूट- पर्यटकांना 'मोशन कॅप्चर आणि व्हर्च्युअल शूट्स' च्या इमर्सिव्ह सेटमध्ये प्रवेश केल्यानंतर वेगळ्या अशा इमर्सिव्ह डिजिटल वातावरणाचा अनुभव घेता येणार आहे. येथे तुम्हाला चित्रपट निर्मितीच्या जगात डोकावता येते. विशेष म्हणजे सिनेमॅटिक जादूचा एक भाग म्हणून रमता येते.

पर्यटनाचा आनंद लुटा (Source- ETV Bharat)
  • कार्निवल परेड- रस्त्यावर फिरणारे 'लार्जर दॅन लाईफ' थीम असलेले फ्लोट्स एक अविस्मरणीय दर्शन घडवून आणतात. या टेबलॉक्समध्ये विदूषक, जुगलबंदी आणि स्टिल्ट वॉकर्स आणखी शोभा वाढवितात. एकंदरीत, रस्त्यावर फिरणारे टॅब्लॉक्स तुमच्या मनाला प्रफुल्लित करतात. तसेच पर्यटनाची मजा आणखीन वाढवितात.

डीजेच्या तालावर थिरका (Source- ETV Bharat)
  • डीजे ऑन व्हील्स- डीजे ऑन व्हील्सनं वाजवलेल्या पेप्पी डान्स ट्रॅकवर वाजल्यानंतर एकदम पार्टीचा अनुभव येतो. या डिजेच्या तालावर तुमची पावले आपोआप थिरकायला लागतात.

बजेटनुसार राहण्याची व्यवस्था - तुमच्यासाठी योग्य असलेले पॅकेज निवडून तुम्ही या महोत्सवा'चा आनंद घेऊ शकता. रामोजी फिल्म सिटीमध्ये संध्याकाळी, पर्यटकांसाठी विशेष कार्यक्रमांसह लाइव्ह डीजे परफॉर्मन्स असेल. दरम्यान तुम्ही या विशेष पॅकजचा लाभ घेऊ शकता. लक्झरी हॉटेल - सितारा, कम्फर्ट हॉटेल- तारा, शांतिनिकेतन - बजेट हॉटेल, वसुंधरा व्हिला- फार्म हाऊस, ग्रीन्स इन - हॉटेल सहारा या ठिकाणी मुक्काम करण्यासाठी विशेष पॅकेजेस उपलब्ध आहेत.

हेही वाचा

  1. कॅरम! शासनाचा एक दुर्लक्षित खेळ; कॅरमचा जगज्जेता अद्यापही नोकरीपासून वंचित
  2. उस्ताद झाकीर हुसैन यांनी अमरावतीत पाचवेळा मिळवली वाहवा; वयाच्या 24 व्या वर्षी गाजवली पहिली मैफिल

Last Updated : Dec 19, 2024, 7:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.