नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशन सुरु होण्याअगोदरच आज काँग्रेस खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वक्तव्याचे पडसाद आज संसदेत उमटण्याची शक्यता आहे. काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी स्थगन प्रस्ताव सादर केला आहे. काँग्रेस खासदारांनी अमित शाह यांनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे आज संसदेच्या हिवाळी अधिवेशन 2024 मध्ये चांगलंच रणकंदन होण्याची शक्यता आहे.
Congress MP Manickam Tagore gives Adjournment Motion Notice in Lok Sabha to discuss Union Home Minister Amit Shah's remarks regarding Dr BR Ambedkar. pic.twitter.com/bHpGNfZMNz
— ANI (@ANI) December 18, 2024
काँग्रेस खासदारांनी दिला स्थगन प्रस्ताव : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीका केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वक्तव्य केलं. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस खासदारांनी अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अमित शाह यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस खासदारांनी लावून धरली आहे. त्यासाठी काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी लोकसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे. या विषयावर चर्चा करण्यात येऊन अमित शाह यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी केला जोरदार निषेध : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याचा इंडिया आघाडीच्या नेत्यांनी जोरदार निषेध केला. अमित शाह यांच्या राज्यसभेतील भाषणावर काँग्रेस खासदार किशोरी लाल शर्मा यांनीही हल्लाबोल केला. "अमित शाह सभागृहात बाबासाहेब आंबेडकरांवर बोलले आहे. अमित शाह यांच्या या वक्तव्याचा आम्ही 'इंडिया' आघाडीच्या वतीनं निषेध करतो," असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर बोलताना बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरुन कथित वक्तव्य केलं. "विरोधक सतत आंबेडकर, आंबेडकर आंबेडकर असं बोलत राहतात. विरोधकांनी इतका देवााच धावा केला, असता, तर स्वर्ग मिळाला असता," असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे अमित शाह यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
हेही वाचा :
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024: वन नेशन वन इलेक्शन विधेयक होणार संसदेत सादर; शिवसेना, भाजपाच्या खासदारांना व्हीप जारी
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 : "देशाच्या पहिल्या अंतरिम सरकारनं..."निर्मला सीतारामण यांची काँग्रेसवर टीका
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 : विरोधी पक्षातील नेत्यांनी संविधान खिशातच ठेवलं, तर भाजपानं . . . . राजनाथ सिंहांचा हल्लाबोल