महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

झेलम नदीत बोट उलटून दुर्घटना, चार जणांचा मृत्यू - boat capsizes in Jhelum - BOAT CAPSIZES IN JHELUM

जम्मू काश्मीरमधील झेलम नदीत बोट उलटून दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला.

jhelum river  boat capsizes
jhelum river boat capsizes

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 10:49 AM IST

Updated : Apr 16, 2024, 11:30 AM IST

बोट उलटून दुर्घटना

श्रीनगर- जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील गुंडबल भागात बोट उलटून दुर्घटना झाली. ही दुर्घटना झेलम नदीत घडली आहे. या दुर्घटनेत काही प्रवाशी बेपत्ता झाले आहेत. घटनास्थळी एसडीआरएफ आणि पोलीस अधिकारी पोहोचले आहेत. बोट उलटून दुर्घटना झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत.

एसडीआरएफची टीम आणि स्थानिकांकडून मदतकार्य सुरू आहे. नदीत बुडालेल्या प्रवाशांची नावे अद्याप समोर आली नाहीत. गेल्या दहा वर्षांपासून गुंडबल हा भाग श्रीनगरला जोडण्यासाठी पुलाचं काम सुरू आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना प्रवासासाठी नदीतून जावे लागते. बोटीत किती लोक होते? किती बेपत्ता झाली आहेत, याची प्रशासनाकडून माहिती घेण्याचं काम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे झेलमसह काही नद्यांची जलपातळी वाढली आहे.

ओमर अब्दुल्ला यांच्याकडून चिंता व्यक्त-जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी दुर्घटनेबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी एक्स मीडियावरील पोस्टमध्ये ओमरने लिहिले की, “श्रीनगरजवळील लासजान येथे झेलम नदीवर बोट उलटल्याच्या वृत्तामुळे चिंता वाटत आहे. मी आशा करतो, तसेच प्रार्थना करतो की या बोटीवरील सर्वांची सुरक्षितपणे आणि त्वरीत सुटका होईल.” श्रीनगरचे जिल्हाधिकारी डॉ. बिलाल मोही-उद्द-दीन भट यांच्या निर्देशानुसार, मानवी जीवांचे रक्षण करण्यासाठी बचाव पथके घटनास्थळी पोहोचल्याचं श्रीनगरच प्रशासाननं सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार बोटीमधून काही मुले प्रवास करत होते.

गुजरातमध्ये जानेवारीत घडली होती दुर्घटना - गुजरातमधील वडोदरा शहरातील हरणी तलावात बोट उलटून झालेल्या भीषण अपघातात 12 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा मृत्यू झाला होता. ही दुर्घटना 19 जानेवारी 2024 मध्ये घडली होती. वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया इथल्या न्यू सनराईज शाळेचे विद्यार्थी हरणी तलावावर फिरण्यासाठी गेल्यानंतर ही दुर्घटना घडली होती. या प्रकरणी गुजरात सरकारनं चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा-

  1. गुजरात किनारपट्टीवर संशयित इराणी बोट ताब्यात; 1000 कोटींपेक्षा अधिकचे अंमली पदार्थ जप्त
  2. गुजरातमधील हरणी तलावात बोट उलटून 14 जणांचा मृत्यू; सरकारनं दिले चौकशीचे आदेश
Last Updated : Apr 16, 2024, 11:30 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details