बनिहाल/जम्मू- शुक्रवारी रामबन जिल्ह्यात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर एसयूव्ही गाडी घसरुन दरीत पडल्याने दहा जणांचा मृत्यू झाला, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. वाहन श्रीनगरहून जम्मूकडे जात असताना सकाळी 1.15 च्या सुमारास जिल्ह्यातील बॅटरी चष्मा भागात ही कार 300 फूट खोल दरीत कोसळली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, " या अपघातामध्ये एकूण दहा जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. मुसळधार पावसात 10 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत." पोलीसांनी पुढे सांगितलं की, "मृतांमध्ये कार चालक बलवान सिंग (47) जम्मूमधील अंब घोरथा आणि बिहारमधील पश्चिम चंपारण येथील विपिन मुखिया भैरगंग यांचा समावेश आहे. बचावकार्य सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले."
याआधी ४ मार्चलाही याच भागात रस्ता अपघात झाला होता. त्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला होता, तर ३ जण जखमी झाले होते. त्यांचे वाहन रस्त्यावरून घसरून खाली खड्ड्यात पडल्याने हा अपघात झाला. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे अब्दुल वाहिद बाली, अनायतुल्ला, मोहम्मद अयुब बाली आणि ड्रायव्हर सज्जाद अहमद अशी आहेत.
बचाव मोहीम सुरूरामबन जिल्ह्यातील मालिगाम येथून उखरालकडे जाणारे एक वाहन रस्त्यावरून घसरले, असे पोलिसांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. वाहन चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे खोल खड्ड्यात पडले. पोलिसांनी सांगितले की, "बचाव मोहीम सुरू करण्यात आली असून अपघातस्थळावरून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत." पोलिसांनी सांगितले की, तीन जखमींना उखरळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत नागरिकांची ओळख पटवण्याचे आणि इतर मृतदेह दरीतून वर काढण्याचा कामाला सुरूवात झाली आहे." मृतांच्या नातेवाईकांना संपर्क करण्याचा प्रयत्नही पोलिसांकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा -
- सुप्रिया सुळेंचे आभार मानत रुपाली चाकणकरांची खोचक टीका, म्हणाल्या... - Rupali Chakankar
- कोल्हापुरातून संजय मंडलिकांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर; व्यक्त केला विजयाचा विश्वास - Sanjay Mandlik
- "प्रसिद्ध नट तर घ्यायचा"; जयंत पाटलांचा मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला - Jayant Patil On Govinda