राजनांदगाव (छत्तीसगड) Acharya Shri Vidyasagar Took Samadhi : जैन धर्मियांचे दिगंबर पंथियाचे संत आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांनी छत्तीसगडमधील डोंगरगड येथील चंद्रगिरी पर्वतावर समाधी घेतलीय. जैन मुनी आचार्य काही दिवसांपासून अस्वस्थ होते. जैन आचार्य श्री विद्यासागरजी महाराज रात्री ब्रह्मलिन झाले. तीन दिवसांपासून त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केला होता. याआधी इतर जैन संतांच्या उपस्थितीत त्यांनी संघाशी संबंधित सर्व कामातून निवृत्ती घेतली आणि त्याच दिवशी आचार्य पदाचा राजीनामाही दिला होता.
आचार्यांनी सोडला देह : जगप्रसिद्ध जैन ऋषी आचार्य श्री विद्यासागर महाराज यांचं निधन झालंय. आज पहाटे अडीचच्या सुमारास त्यांनी देह सोडला. आचार्य विद्यासागर महाराज गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ होते. आचार्य विद्यासागर महाराज डोंगरगडच्या चंद्रगिरी पर्वतावर मुक्कामी होते. डोनारगड येथील चंद्रगिरी पर्वत हे जैन समाजाचं प्रमुख धार्मिक स्थळ आहे. तिथं आचार्य श्री विद्यासागर महाराज यांनी समाधी घेतलीय.
आज डोंगरगड इथं होणार अंतिम संस्कार : जैन आचार्य श्री विद्यासागर महाराज हे जैन धर्मातील प्रमुख आचार्यांपैकी एक होते. जैन साधू आचार्यांच्या निधनाचं वृत्त समजताच डोंगरगड इथं जैन समाजाचे अनुयायी मोठ्या संख्येनं जमा होत आहेत. आज रविवारी डोला चंद्रगिरी तीर्थ डोंगरगड इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या काळात जैन बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त : गेल्या वर्षी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी डोंगरगडला आले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी जैन आचार्य श्री विद्यासागर महाराज यांचीही भेट घेतली होती. या भेटीचा फोटोही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यानंतर आज त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी 'X'वर एक पोस्ट करत दुःख व्यक्त केलंय.
हेही वाचा :
- रुळावरुन प्लॅटफॉर्मवर चढलं रेल्वेचं इंजिन; वेग कमी असल्यानं टळला मोठा अपघात
- पडद्यामागं राहून काम करणारा नेता ते छत्तीसगडचे मुख्यमंत्री, कोण आहेत विष्णुदेव साय?