सिंगापूर : सिंगापूरमध्ये कासवांची तस्करी करुन वाहतूक केल्याप्रकरणी एका भारतीय नागरिकाला एक वर्ष चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी अब्दुल जाफर हाजी अली याला ऑगस्टमध्ये 58 कासवांसह पकडण्यात आलं होतं.
काय आहे प्रकरण? : आरोपी अली भारतातून 29 ऑगस्ट 2024 रोजी सिंगापूरच्या चांगी विमानतळावर पोहोचला, त्याचा पुढे जकार्ताला जाण्याच्या विचार होता. पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, हे कासव त्याच्या वैयक्तिक सामानात लपवून ठेवण्यात आलं होतं. त्यानं कासव व्हेंटिलेशनशिवाय पॅक केली होती. या प्रवासा दरम्यान एका कासवाचा मृत्यू झाला होता. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरनं भारतीय स्टार कासव "असुरक्षित" म्हणून वर्गीकरण केलं आहे.
मित्राकडून मिळाले होते कासव : न्यायालयाच्या कागदपत्रांवरून असं दिसून येतं की, "अलीला "भाई" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मित्राकडून कासव मिळालं होतं. ज्याने त्याच्या प्रवासाची आणि निवासाची व्यवस्था केली होती. त्या बदल्यात भाईनं अलीला एक पॅक बॅग जकार्ताला नेण्यास सांगितलं होतं. 28 ऑगस्ट रोजी चेन्नई येथे भाईकडून बॅग मिळाल्यानंतर त्यानं बॅगची सामग्री तपासली नसल्याचं अलीनं मान्य केलं."
यापूर्वीही सीमाशुल्क विभागानं केली234 वन्यप्राण्यांची सुटका :यापूर्वीही अशीच एक घटना घडली होती. बँकॉकवरुन बंगळुरुमध्ये वन्यप्राण्यांची तस्करी करण्यात येत असल्याचं उघड झालं होतं. या प्रकरणी सीमाशुल्क विभागानं एका तस्कराला अटक केली होती. या तस्कराच्या तावडीतून अजगर, दुर्मीळ कासव, सरडा, कांगारू अशा 234 वन्यप्राण्यांची सुटका करण्यात आली होती.
ट्रॉलीमध्ये आढळून आले वन्यप्राणी :बँकॉकवरुन आलेल्या विमान क्रमांक एफडी 117 या विमानानं एक प्रवासी बँकॉकवरुन बंगळुरुच्या देवनहळ्ळी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. यावेळी त्या प्रवाशाची एअर कस्टम अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली असता, त्याच्या ट्रॉलीमध्ये दुर्मीळ कासव, अजगर, छोटा कांगारू असे 234 वन्यप्राणी आढळून आले होते. त्यामुळं मोठी खळबळ उडाली. वन्य प्राण्यांची तस्करी करण्यात येत असल्यानं एअर कस्टम अधिकाऱ्यांनी या प्रवाशाला अटक केली होती.
हेही वाचा -
- Gold Smuggling: सोन्याच्या तस्करीच्या आरोपावरून मुंबई विमानतळ कस्टम्सने केली भारतीय नागरिकाला अटक; २.२८ कोटी रुपयांचे केले सोने जप्त
- Mumbai Crime : एनसीबीची मोठी कारवाई! मुंबईच्या हॉटेलमधून 15 कोटींचे ड्रग्स जप्त, 2 विदेशी नागरिकांना अटक
- Fake Passport : बनावट पासपोर्ट वापरून भारतवारी करणाऱ्या नागरिकाला अटक