महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारतीय सैन्याला सलाम; जवानांच्या शौर्याचा 'हा' व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील - Indian Army Rescue Operation

Indian Army Rescue Operation : 'भारत मातेचा पुत्र मी सर्वेसर्वा' कवितेतील या ओळीप्रमाणं देशावर कोणतंही संकट आलं तरी त्या संकटाला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य कधीही तयार असतं. देशविरोधी कृत्य करणाऱ्यांचा खात्मा करण्यासाठी सैन्य सीमा भागात डोळ्यात तेल घालून सुरक्षा करतं. देशांतर्गत आलेल्या संकटकाळात सैन्य नागरिकांच्या मदतीला धावून जातं. हे सगळं आम्ही का सांगतोय? वाचा...

Indian Army Rescue Operation
शिमला येथे भारतीय सैन्याचं रेस्क्यू ऑपरेशन (ANI)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 10:22 AM IST

हैदराबाद Indian Army Rescue Operation : हिमाचल प्रदेशमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. शिमला आ्णि परिसरामध्ये ढगफुटी झाल्यानं अनेक नागरिक बेपत्ता झाले आहेत. ढगफुटीमुळं अनेकांना प्राण गमवावे लागले. अशा या कठीण काळात आपले भारतीय सैन्य नागरिकांना मदत करण्यासाठी धावून आले आहेत. 'ANI' या वृत्तसंस्थेनं पूर भागात मदत करतानाचा भारतीय सैन्याचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. अंगावर शहारे आणणारा हा व्हिडिओ आहे.

हिमाचलमध्ये भारतीय सैन्याचं रेस्क्यू ऑपरेशन :'निधडया छातीवर झेलतो मी संकटांचे वार','ना करतो मी प्राणाची पर्वा' कवितेतील या ओळींप्रमाणं भारतीय सैन्य आपल्या जीवाची पर्वा न करता देशवासियांच्या सेवेसाठी तत्पर असतात. असाच एक प्रत्यय हिमाचल प्रदेश आणि केरळमधील वायनाड येथे आलाय. हिमाचलमध्ये पूरस्थिती भयंकर झाली आहे. त्यामुळं तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी भारतीय सैन्याची मदत घेण्यात आली. हिमाचलमधील रामपूर येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सैन्यानं तातपुरत्या स्वरुपाचा एक पूल तयार केला आहे.

नदीवर बांधला पूल : नदीनं रौद्ररुप धारण केलं असून, प्रचंड वेगानं पाणी वाहत आहे. अशा नदीवर हा पूल तयार केला असून, याचा व्हिडिओ समोर आलाय. खाली प्रचंड वेगानं वाहणारं पाणी, त्या पाण्याचे वेगानं अंगावर येणारे फवारे, वेगाने वाहणारे वारे आणि वरुन कोसळत असलेला पाऊस, अशा संकटांचा सामना करत आपले भारतीय सैन्य जीवाची पर्वा न करता त्या पुलाच्या माध्यमातून नागरिकांसाठी 'देवदूत' बनले आहेत.

वायनाडमध्ये भारतीय सैन्याचं कार्य : तिकडं केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन झालं. यात आतापर्यंत 308 जणांचा मृत्यू झाला असून, रेस्क्यू ऑपरेशन भारतीय सैन्याकडून राबवलं जात आहे. अंगावर रपरप पडणारा पाऊस, डोंगरावरुन कोसळणारी माती अन् दगडं व मृतांचा खच, अशा कठीण परिस्थितीमध्ये सैन्य बचाव व मदत कार्य करत आहे. त्यामुळं भारतीय सैन्य हे केवळ सीमा भागातील सुरक्षा न करता देशांतर्गतही आपली सेवा देत आहे.

हेही वाचा -

  1. मुसळधार पावसामुळं उत्तराखंडमध्ये दहा जणांचा मृत्यू; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळं 50 जण बेपत्ता, केदारनाथ यात्रा स्थगित - Cloudbursts in Uttarakhand Himachal
  2. मुंबईसह कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा; रायगडावर अडकलेल्या शेकडो पर्यटकांची सुटका, मुख्यमंत्र्यांचं मुंबईकरांना आवाहन - Maharashtra Rain Update

ABOUT THE AUTHOR

...view details